पुणे-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी आपल्या प्रभागात मास्क चे मोफत वाटप सुरु केले आहे.
महाराष्ट्रात आणि जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी, राज्यात मास्क च्या जास्त मागणी मुळे तुटवडा जाणवू लागल्याने व मेडिकल तसेच हॉस्पिटल मध्ये उपलब्ध होत नसल्या कारणाने प्रभाग क्र 26 हे आपलं कुटूंब असून त्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी समजून प्रभाग क्र 26 मधील गरीब व गरजू नागरिकांसाठी मोफत मास्क वाटप सुरु केले आहे. आणि कसली परवा न करता नागरिकांच्या मदतीसाठी शिवसैनिक सज्ज झाले.असे नगरसेवक भानगिरे यांनी सांगितले.
या वेळी अभिमन्यू दादा भानगिरे ,सचिन नाना तरवडे ,योगेश सातव ,विकास शेवाळे संतोष जाधव,प्रवीण हिलगे, विक्रम फुकटे, म्हेत्रे काका ,रोहित पवार जेष्ठ नागरिक महिला ,कार्यकर्ते नाना भानगिरे आयोजक कमिटी उपस्थित होते