पुणे-
नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे तसेच भारती हॉस्पिटल यांच्या संयुक्तविद्यमाने प्रभाग क्र.26 येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यातच राज्यात रक्ताचा तुटवडा असून रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे जाहीर आव्हान केले होते.त्या नुसार आज सोशल डिस्टनसिंग चे नियम पळून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.प्रत्येक रक्तदात्यास छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व प्रमाण पत्र देऊन सन्मान करण्यात आला .या शिबिरात महिला व युवतींचा यात लक्षणीय सहभाग होता तसेच असंख्य नागरिकांनी यात आपला सहभाग नोंदवला नगरसेक प्रमोद नाना भानगिरे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते, अभिमन्यू भानगिरे,नाना तरवडे, संतोष भानगिरे,योगेश सातव,विक्रम फुकते, प्रवीण हिलगे,रोहित पवार, सुनील पाटील,यांनी या शबीराचे संयोजन केले.