पुणे : जस क्रिकेट अकादमी, पुणे यांच्या तर्फे आयोजित मान्सून प्रीमियर लीग 13 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत अनिरुद्ध नायर(1-4 व नाबाद 25धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर मुंबईच्या क्रिकेट मंत्राज् संघाने जस क्रिकेट अकादमी संघाचा 7 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.
धानोरी येथील जस क्रिकेट अकादमीच्या प्रकाश टिंगरे मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रथम फलंदाजी करताना जस क्रिकेट अकादमी संघाने 20षटकात 4बाद 101धावा केल्या. यात पार्थ हेडगिरेने सर्वाधिक 57चेंडूत 4चौकारांसह 40 धावा, तर ओम खुडेने 14 धावा केल्या. क्रिकेट मंत्राज् संघाकडून अनिरुद्ध नायर 1-4, परीन दळवी 1-9, युवराज पाटील 1-20, गांधार भानसे 1-21 यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून जस क्रिकेट अकादमी संघाला 101धावावर रोखले.
याच्या उत्तरात हे आव्हान क्रिकेट मंत्राज् संघाने 18.2षटकात 3बाद 102धावा करून पूर्ण केले. यामध्ये अनिरुद्ध नायरने गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही कमाल दाखवत नाबाद 25 धावांची खेळी केली. अनिरुद्ध नायरला शिवांश कोळीने 26धावा व श्रीहन हरिदासने नाबाद 18 धावा काढून सुरेख साथ देत संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी अनिरुद्ध नायर ठरला. याआधी स्पर्धेचे उदघाटन पत्रकार अभिजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक पराग मोरे,प्रभाकर मोरे, विशाल इथापे, अविनाश कोरे, अनुराग स्वॅन आदीमान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:जस क्रिकेट अकादमी: 20षटकात 4बाद 101धावा (पार्थ हेडगिरे 40(57,4×4), ओम खुडे 14, अनिरुद्ध नायर 1-4, परीन दळवी 1-9, युवराज पाटील 1-20, गांधार भानसे 1-21)पराभूत वि.क्रिकेट मंत्राज्(मुंबई):18.2षटकात 3बाद 102धावा(शिवांश कोळी 26(35,5×4), अनिरुद्ध नायर नाबाद 25(33,3×4), श्रीहन हरिदास नाबाद 18(19,1×4), यथार्थ जगदाळे 1-15); सामनावीर- अनिरुद्ध नायर; क्रिकेट मंत्राज् संघ 7 गडी राखून विजयी.