पुणे, 7 मे 2022:बारामती लॉन टेनिस क्लबच्या वतीने आयोजित व प्रविण मसालेवाले प्रायोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षांखालील टेनिस सर्किट स्पर्धेच्या पहिल्या मालिकेत अनय सुमंत, अखिलेश चव्हाण, शर्विल गंगाखेडकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजयी सलामी दिली.
बारामती क्लब टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात अनय सुमंत याने आदित्य उपाध्येचा टायब्रेकमध्ये 6-5(4) असा संघर्षपूर्ण पराभव केला. अखिलेश चव्हाण व शर्विल गंगाखेडकर यांनी अनुक्रमे आहान जैन व विराज कुलकर्णी यांचा 6-4 असा पराभव करून आगेकूच केली. रेयांश गुंड याने कुमार सुहानवर 6-0 असा एकतर्फी विजय मिळवला. याआधी स्पर्धेचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रविण मसालेवालेचे संचालक विशाल चोरडिया आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, बारामती लॉन टेनिस क्लबचे सचिव दत्तात्रय बोऱ्हाडे, एमएसएलटीए सुपरवायझर तेजल कुलकर्णी आणि बारामती लॉन टेनिस क्लबचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: पहिली फेरी:
रेयांश गुंड वि.वि.कुमार सुहान 6-0;
अनय सुमंत वि.वि.आदित्य उपाध्ये 6-5(4);
अखिलेश चव्हाण वि.वि.आहान जैन 6-4;
आश्वथ भुजबळ वि.वि.आगम जैन 6-0;
सोहम रणसुभे वि.वि.गौरांग सुपले 6-2;
शर्विल गंगाखेडकर वि.वि.विराज कुलकर्णी 6-4;आवीर पतोडीया वि.वि.प्रसाद क्षितिज 6-5(6)