पुणे –
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त दि. ३ जानेवारी रोजी महावितरण पुणे परिमंडलातील विविध
कार्यालयात काम करणा-या महिला अधिकारी व कर्मचारी यांचे हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात
आले होते.
पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री सचिन तालेवार यांनी या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई
फुले यांच्या छायाचित्रास पुष्प अपर्ण केले. या शिबिरात एकूण ६१० महिला अधिकारी व कर्मचारी यांचे हिमोग्लोबिन
तपासण्यात आले.