कोरोनाच्या लढाईत अजितदादा रोज महापौरांना फोन करतात हेच बापटांचे दुखणे – प्रशांत जगताप (व्हिडीओ)
पुणे- कोरोनाशी पुणे महापालिका आणि राज्य सरकार दोघेही लढत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्री अजितदादा रोज सकाळी पुण्याच्या महापौरांना फोन करून विचारपूस करतात हेच खासदार असलेल्या गिरीश बापटांचे दुखणे असावे असा टोला माजी महापौर प्रशांत जगताप यांनी लगावला आहे .केंद्रीय मंत्री म्हणून टेंभा मिरविणारे प्रकाश जावडेकर आणि ४० वर्षाच्या राजकारणाची परंपरा असलेले आता केंद्रात खासदार असलेले गिरीश बापट या दोहोंनी कोरोना विरोधातील या लढाईत नेमके काय योगदान दिले ? असा सवाल हि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केला आहे.
काल खासदार बापटांच्या नेतृत्वाखाली महापौर आणि अन्य पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन कोरोना च्या लढाईत पालकमंत्री ,राज्य सरकार आणि पुण्याचे स्थानिक प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप केला होता. याला रोख ठोक उत्तर देताना नेमके माजी महापौर प्रशांत जगताप यांनी पहा आणि ऐका नेमके काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात ….
https://youtu.be/iDLxNZw4Zfo