पुणे, दि, 17 ( प्रतिनिधी) : एक कार्यकर्ता पंचवीस लाभार्थी असा अनोखा उपक्रम राबवण्याचा संकल्प जाहीर करत खा.गिरीश बापट यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस कसबा गणपतीच्या साक्षीने मोठ्या उत्साहात साजरा केला. येत्या वर्षभरात भाजपाचे शहरातील किमान पाच हजार कार्यकर्ते हा उपक्रम अंमलात आणतील. अशी माहितीही खासदार बापट यांनी कसबा गणपती मंडळासमोर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली. हे कार्यकर्ते पंतप्रधानांच्या सर्व योजना पुणेकरांपर्यंत पोहोचवतील त्याचा लाभ शहरातील किमान सव्वा लाख पुणेकरांना होईल अशी अपेक्षाही बापट यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार मुक्ता टिळक, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, स्वरदा बापट, उज्वल केसकर,राजेश येनपुरे, उमेश गायकवाड,योगेश समेळ, गायत्री खडके,प्रमोद कोंढरे,वृशाली चौधरी, अजय वीरकर, बादशहा सय्यद, पुष्कर तुळजापूरकर, सुहास कुलकर्णी, सतीश मोहोळ, निलेश कदम, बापू मानकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांना उद्देशून एक कार्यकर्ता पंचवीस लाभार्थी या उपक्रमाची माहिती देताना खासदार बापट म्हणाले की जनधन योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, मुद्रा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अशा अनेक योजना पंतप्रधान मोदी यांनी सुरू केल्या आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हेच उद्दिष्ट कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समोर ठेवले पाहिजे.भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांच्या हितासाठीच काम करतो. तळागाळातील गरिबांची उन्नती करणे हेच पक्षाचे ध्येयधोरण आहे. हे आपण अशा उपक्रमातून दाखवून देणार आहोत. सतिश मोहोळ यांनी सूत्रसंचालन केले.