पुणे- सकाळी साडेसातपासून शिकाऊ वाहन चालक परवाना निर्णयाचा फायदा ३०० अधिक लोकांना होणार असून हा निर्णय ऐतिहासिक आणि जनहिताचा असल्याचे पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे राजू घाटोळे (अध्यक्ष) यशवंत कुंभार (संस्थापक अध्यक्ष )निलेश गांगुर्डे( सचिव) निखिल बोराडे (खजिनदार) यांनी म्हटले आहे . आणि या निर्णयाबद्दल पुणे परिवहन अधिकारी अजित शिंदे आणि अन्य प्रशासनाचे आभार मानले आहेत
या संदर्भात राजू घातोले यांनी सांगितले कि ,’सकाळी साडेसात वाजता कार्यालयीन वेळेच्या दोन तास अगोदर शिकाऊ लायसन्स देण्याचा परिवहन कार्यालय पुणे यांचा हा निर्णय पुणेकर नागरिकांना सुखद धक्का देणारा ऐतिहासिक निर्णय आहे या निर्णयामुळे दररोज अतिरिक्त 300 ते 400 वाहनचालकांना शिकाऊ परवाना मिळणार आहे एका दिवसात 700 शिकाऊ परवाना देण्याचा विक्रम परिवहन कार्यालय पुणे यांच्याकडून नोंदवण्यात येणार आहे या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य एका दिवसात सर्वात जास्त शिकाऊ परवाना देणारे परिवहन कार्यालय म्हणून ऐतिहासिक नोंद महाराष्ट्रात होणार आहे पूर्वी परिवहन कार्यालय पुणे येथे शिकाऊ लायसन्स परवाना मिळण्यासाठी चार ते सहा महिन्याचा वेटिंग पिरेड होता पुणे परिवहन अधिकारी अजित शिंदे यांचा मानस आहे .पुणेकर वाहन चालकांनी आज शिकाऊ परवाना मिळण्यासाठी अर्ज केला तर किमान एक ते दोन दिवसा नंतर त्यांना पूर्वनियोजित वेळ मिळाली पाहिजे आणि त्यादृष्टीने अजित शिंदे काम करत आहेत covid-19 च्या पार्श्वभूमीवर याप्रमाणे कोरोना योद्धा कार्यरत आहेत त्याप्रमाणे कोरोना कालखंडात आपल्या कुटुंबाबरोबर जो वेळ घालवायचा असतो तो वेळ पुणेकर नागरिकांना शिकाऊ परवाना देण्यासाठी अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे कार्यालयातील परिवहन योद्धा कार्यरत आहेत. या ऐतिहासिक निर्णयाचे पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन चा अध्यक्ष या नात्याने मी स्वागत करत आहे परिवहन विभागाच्या या उपक्रमात पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन सकाळी दोन तास अगोदर साडेसात वाजता पूर्वनियोजित वेळ घेऊन मोटार ड्रायव्हिंग स्कूल मधून आलेल्या वाहनचालकांच्या शिकाऊ लायसन च्या पूर्वनियोजित वेळ घेऊन संपूर्ण सहकार्य प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांना करण्यात येणार आहे परिवहन विभागाने शंभर टक्के क्षमतेचा वापर करून शिकाऊ लायसन्स परवाना देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन स्वागत करत आहे तसेच हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल परिवहन अधिकारी पुणे यांचे पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे राजू घाटोळे (अध्यक्ष) यशवंत कुंभार (संस्थापक अध्यक्ष )निलेश गांगुर्डे( सचिव) निखिल बोराडे (खजिनदार) आदींनी आभार मानले आहेत.