पुणे-महाराष्ट्र राज्य कला संचलनालया तर्फे सन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंट्री ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल आजच जाहीर झाला असून गणेशखिंड रोडवरील मॉडर्न हायस्कूल या शाळेचा निकाल शाळेचा एलिमेंट्री ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल ९४.६४% इतका लागला आहे.कु. वावरे अनुष्का-९अ व सावंत प्रसाद-९अ हे दोघे A ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाले असून अस्वले राजनंदिनी–९अ, बटवाल अवनी- ८अ, गायकवाड कार्तिकी-९अ, जाधव अस्मिता-९अ, काळे स्नेहल-९अ,रानवडे सई-८अ,देशमुख वेदांत-९अ,दहीभाते आकाश-९क,खंडागळे हर्षवर्धन- ९अ,उंडे सत्यजित-८अ हे विद्यार्थी B ग्रेड मिळून उत्तीर्ण झाले आहेत ४१ विद्यार्थी C ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल १००% इतका लागला असून कुमारी बराटे ईश्वरी-९अ, कुमारी सोनवणे सिद्धी -१०ड, कुमारी शिंदे प्रीती-१०ड, यादव महेश-१०ड हे विद्यार्थी A ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाले असून उबाळे शुभम हा विद्यार्थी बी ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाला आहे. १० विद्यार्थी C ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अधिक मार्गदर्शन मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा कामथे, शाळेतील कलाशिक्षक तथा पर्यवेक्षक शीलरतन बंगाळे यांचे लाभले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी चे कार्याध्यक्ष गजानन एकबोटे , कार्यवाह शामकांत देशमुख , शाळा समिती अध्यक्ष दीपक मराठे , प्र मुख्याध्यापक चित्तरंजन कांबळे ,मॉडर्न हायस्कूल गणेशखिंड चे समन्वयक उद्धव खरे , उपमुख्याध्यापिका सौ शारदा साबळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.