पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याचा ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा देतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेनंतर मनसेने पुण्यात एल्गार पुकारला आहे. ‘आता मनसेकडून ‘हर हर महादेव’ अशा घोषणेने उत्तर देण्यात येत आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात हे आंदोलन करण्यात आले.
‘दूध मांगोगे तो खीर देंगे, भारत मांगोगे तो पाकिस्तान को चिर देंगे’ या घोषणा देत मनसे कडून आंदोलन करण्यात येत असून पाकिस्तानच्या झेंड्याची प्रतिकृती जाळून निषेध करण्यात आला . यावेळी अलका टॉकीज चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..
पुण्यात एटीएस आणि एनआयएच्या पथकाने कारवाई करत कोंढवा येथून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली होती.या विरोधात पुण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इस्लामिक संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्यांना पोलिसांनी अटक केले असता काही आंदोलनकर्त्यानी यावेळी “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा दिल्या असे सांगणारे या घटनेचा व्हिडिओ मोठया प्रमाणावर व्हायरल झाले .
राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार देश रक्षणार्थ “हर हर महादेव “म्हणत महाराष्ट्र सैनिक उद्या रस्त्यावर उतरून इशारा देईल असे मनसे ने जाहीर केले होते त्या नुसार आज मोठया संख्येने हिंदूस्थान जिंदाबाद हर हर महादेव च्या घोषणा देत मनसे रस्त्यावर उतरली होती.हिंदुस्तान जिंदाबाद चे मोठं पोस्टर मनसेने अलका चौकात लावले होते . जोरदार घोषणा नी अलका चौक दणाणून सोडत मनसे सैनिकानी पाकिस्तानचा झेंडा जाळला
यावेळी मनसे चे महाराष्ट्र राज्याचे नेते,सरचिटणीस,उपाध्यक्ष,शहर पातळी वरील सर्व पदाधिकारी ,सलग्न संघटनाचे पदाधिकारी, महिला सेनेच्या पदाधिकारी lव मोठया संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होत