पुणे-अवघ्या तासभरात एका महिलेच्या घरातून तब्बल चार लाख रुपये किंमतीचे दागिने चोरट्याने चोरून नेल्याची घटना सुमारे आठवड्यापूर्वी घडल्याचे आज पोलिसांनी येथे माध्यमांना सांगितले आहे. गेल्या १३ फेब्रुवारीला हि घटना सकाळी साडेदहा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली घोरपडे पेठेतील एकबोटे कॉलनीत राहणाऱ्या ५६ वर्षीय महिलेने यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे. हि महिला सुनेला घेऊन देवदर्शनाला तासभर गेली असता , घरात मोलकरीण असताना हि चोरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.