पुणे-भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील ज्येष्ठ व अनुभवी कार्यकर्ते, पार्टीच्या माध्यम विभागाची जबाबदारी गेली अनेक वर्षापासून सांभाळणारे संजय मयेकर यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती पत्र दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली. मयेकर यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र भाजपा प्रचार प्रसिद्ध प्रमुख अशी जबाबदारी असून, ते विद्या सहकारी बँकेचे संचालक आहेत .