पुणे-ग्रे रंगाचा टाॅप ,काळ्या रंगाची जीन पँट, हातात पर्स आणि शॉपिंग बॅग असलेल्या एका अंदाजे ४० वर्षीय महिलेने विमाननगर च्या फिनिक्स मॉल मध्ये हाथ कि सफाई दाखवून २ लाख ८२ हजार ७५० रुपयांचे सोन्याचे ब्रेस लेट हातोहाथ लंपास केले.
या प्रकरणी राहुल चौरसिया (वय ३० रा. गणेश नगर ,बोपखेल ) या ब्लू स्टोन ,फिनिक्स मार्केट ,विमान नगर च्या स्टोअर मॅनेजरने विमाननगर पोलिसात फिर्याद नोंदविली आहे. त्यांच्या ब्लू स्टोन शो रूम मध्ये काचेच्या कपाटात डिस्प्ले साठी सोन्याचे, हिऱ्याचे दागिने ठेवलेले आहेत यातून हे ब्रेसलेट या महिलेने लांबविले , हि चोरी साधारणतः ५ मार्च रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाली .विमान नगर चे फौजदार संदीप करपे या महिलेचा शोध घेत आहेत .