भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांची आघाडी
लागोपाठ चार वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद भोगल्याने रासनेंची दमछाक … बालेकिल्ल्याला सुरुंग महापालिकेच्याच २ पदाधिकाऱ्यांच्या कारभाराने
पुणे -पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघ आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरू आहे. पुणे महापालिकेत तब्बल १०० नगरसेवकांचे म्हणजे हत्तीचे बळ घेऊन सत्ता प्राप्त केलेल्या भाजपची आज त्यांचा ४० वर्षे बालेकिल्ला मानला जाणारा कसबा राखण्यासाठी झालेली दम छाक पाहूनही त्यामागचे कारण वरिष्ठ नेत्यांना समजत नसेल तर नवलच म्हणावे लागणार आहे. १०० नगरसेवक असताना केवळ मोहोळ आणि रासने यांच्यावर सलग केलेली कृपादृष्टी आणि या दोहोंनी केलेला लॉबी ,आणि भेदभावाचा, पाय खेचाखेची चा कारभार यामुळेच हा बालेकिल्ला ढासळला आहे. केवळ खासदार गिरीश बापट यांना केसरीवाड्यात प्रचारासाठी आणल्याने बापटांच्या विषयी सहानुभूती निर्माण झाली होती आणि यामुळे धंगेकर यांचे मताधिक्य काही प्रमाणात कमी झाले अन्यथा धंगेकर यांचे मताधिक्य आणखी वाढले असते .
कसबा मतदारसंघ
उमेदवाराचे नाव | मते |
रवींद्र धंगेकर (मविआ) | 56,497 (आघाडीवर) |
हेमंत रासने (भाजप) | 50,490 |
चिंचवड मतदारसंघ
उमेदवाराचे नाव | मते |
अश्विनी जगताप (भाजप) | 39,048 (आघाडीवर) |
नाना काटे (मविआ) | 30476 |
राहुल कलाटे (अपक्ष) | 11458 |
- कसबा मतदारसंघात 13व्या फेरीअखेर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केवळ 123 मते मिळाली आहेत.
दहाव्या फेरीअखेरीस….
रवींद्र धंगेकर : 38286
हेमंत रासने : 34022
कसबा मतदारसंघ
उमेदवाराचे नाव | मते |
रवींद्र धंगेकर (मविआ) | 34,741 (आघाडीवर) |
हेमंत रासने (भाजप) | 30,260 |
चिंचवड मतदारसंघ
उमेदवाराचे नाव | मते |
अश्विनी जगताप (भाजप) | 28,020 (आघाडीवर) |
नाना काटे (मविआ) | 23086 |
राहुल कलाटे (अपक्ष) | 9291 |
कसबा मतदारसंघ
उमेदवाराचे नाव | मते |
रवींद्र धंगेकर (मविआ) | 30,500 (आघाडीवर) |
हेमंत रासने (भाजप) | 27,175 |
चिंचवड मतदारसंघ
उमेदवाराचे नाव | मते |
अश्विनी जगताप (भाजप) | 24,417 (आघाडीवर) |
नाना काटे (मविआ) | 20318 |
राहुल कलाटे (अपक्ष) | 8239 |
- आठव्या फेरीत रवींद्र धंगेकर 30527 मतांनी आघाडीवर आहेत. हेमंत रासने यांना 27187 मते मिळाली आहेत. तर, चिचंवडमध्ये अश्विनी जगताप यांनी 4 हजार मतांनी आघाडी मिळवली आहे.
- सातव्या फेरीत रविंद्र धंगेकर एकूण 25904 मतांसह आघाडीवर आहेत. भाजपचे हेमंत रासने यांना 24633 मते मिळाली आहेत.
कसबा मतदारसंघ
उमेदवाराचे नाव | मते |
रवींद्र धंगेकर (मविआ) | 23,073 (आघाडीवर) |
हेमंत रासने (भाजप) | 20,353 |
चिंचवड मतदारसंघ
उमेदवाराचे नाव | मते |
अश्विनी जगताप (भाजप) | 20,529 (आघाडीवर) |
नाना काटे (मविआ) | 17210 |
राहुल कलाटे (अपक्ष) | 7149 |
कसबा मतदारसंघ
उमेदवाराचे नाव | मते |
रवींद्र धंगेकर (मविआ) | 19,022 (आघाडीवर) |
हेमंत रासने (भाजप) | 14,382 |
चिंचवड मतदारसंघ
उमेदवाराचे नाव | मते |
अश्विनी जगताप (भाजप) | 16,522 (आघाडीवर) |
नाना काटे (मविआ) | 13575 |
राहुल कलाटे (अपक्ष) | 5000 |
- कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीत मतमोजमीच्या सहा फेऱ्या पार पडल्या आहेत. कसब्यात मविआचे रविंद्र धंगेकर हे जवळपास 4 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर, चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांनीही 3 हजार मतांनी आघाडी मिळवली आहे.
- कसबा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना केवळ 4 मते मिळाली आहेत.
- चिंचवड पोटनिवडणुकीत पोस्टल मतमोजणीमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. मविआचे नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे पिछाडीवर आहेत.
- कसबा पोटनिवडणुकीत पोस्टल मतमोजणीमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर आहेत.
- अश्विनी जगताप दुसऱ्या फेरीत 676 मतांनी आघाडीवर
- कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 3000 मतांनी आघाडीवर आहेत.

कसबा पेठेत पहिल्या फेरीत अशी होती मतसंख्या
रवींद्र धंगेकर: ५८४४
हेमंत रासने: २८६३
अभिजीत बीचुकले: ४
आनंद दवे: १२
नोटा: ८६
