पुणे- दोन वर्षापूर्वी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला लोणीकंद पोलिसांच्या सायबर तपास पथकाने अटक केली आहे. आरोपी दोन वर्षापासून खेड तालुक्यातील बहुळ या गावात राहत होता. पथकाने बहुळ गावात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.सचिन बाळु वरघडे (वय-30 रा. ढेरंगे वस्ती, कोरेगाव-भिमा ता. शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात 2020 मध्ये खुनाचा गुन्ह्यासह आर्म अॅक्ट , महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात फरार आरोपी सचिन वरघडे याचा सायबर तपास पथकाकडून चाकण, आळंदी भागात शोध घेतला जात होता. त्यावेळी आरोपी खेड तालुक्यातील बहुळ गावात लपुन बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार , पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे
,सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार),पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरपोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरज किरण गोरे, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे, समीर पिलाणे, सचिन चव्हाण, मल्हारी सपुरे सागर पाटील, महिला पोलीस अंमलदार किर्ती नरवडे, कोमल भोसले, वृंदावनी चव्हाण यांच्या पथकाने केली.