पुणे-कसबा मतदारांचा असं पोस्ट करत ईव्हीएममध्ये मतदान करतानाचा फोटो रूपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्ट केला आहे. हा फोटो त्यांचाच आहे असे समजून विरोधकांनी टीकेची झोड उठवायला सुरूवात केली. त्यानंतर रूपाली ठोंबरे पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.आपण मतदान केलेच नाही तर फोटो काढू कसा? हा फोटो अन्य कुणी तरी पाठवल्याचे त्यांनी म्हटले आहे त्यानंतर त्यांनी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान फेसबुक वर एक फोटो पोस्ट केला आहे , आणि त्यात हेमंत रासने कमळ चिन्ह असलेली मफलर गळ्यात पांघरून काही जणांच्या समवेत दिसत आहेत. त्यावर रुपाली पाटील यांनी असे म्हटले आहे कि,’
कसबा पोटनिवडणूक:मतदान केंद्रावर उमेदवार पक्षाचा मफलर घालून मतदान करणे गुन्हा नाही का? .नूमवी मतदान केंद्रातील फोटो आहे.आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या लोकांनी पहिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसदी घ्यावी.सत्ताधारी यांनी कायद्यानी राज्य चालवावे.

मी शेंगा खाल्ल्या नाहीत ,मी टरफले उचलणार नाही
रुपाली पाटील त्यांच्या वरील गोपनीयतेचा भंग या आरोपाबद्दल बोलताना म्हणाल्या की, कसबा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.त्याच दरम्यान एका मतदाराने मला रविंद्र धंगेकर यांना मतदान केल्याचा फोटो शेअर केला.त्यानंतर तो फोटो सोशल मीडियावर आणि माझा व्हॉटस स्टेटस ठेवला.त्यावरून भाजपकडून टीका करण्यात येत आहे.पण मी अजून मतदान केल नाही. माझ्यावर जे आरोप करीत आहेत त्या व्यक्तीनी माझ्या मतदान केंद्रावर जाऊन पाहून यावे की मी मतदान केले की नाही. त्यामुळे मी शेंगा खाल्ल्या नाही आणि मी टरफले उचलणार नाही. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायचा असेल तर करू शकता. तसेच मी ४.३० वाजता आदर्श विद्यालय येथे मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.