पुणे : इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कतर्फे (आयआयआरएफ) जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या सूर्यदत्त कॉलेज ऑफ फिजिओथेरपीला देशात ३० वे स्थान प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील चौथे, तर देशाच्या पश्चिम विभागात सहावे स्थान मिळाले आहे. २०२३ या वर्षासाठीची ही क्रमवारी नुकतीच एज्युकेशन पोस्ट मासिकात प्रकाशित झाली आहे. या यशाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
‘आयआयआरएफ’ क्रमवारी तज्ज्ञाच्या सखोल विश्लेषनाच्या आधारे करण्यात येते. ही क्रमवारी भारतातील अतिशय वैविध्यपूर्ण आणि अधिकृत असून, कॉर्पोरेट जगतामध्ये या क्रमावरीला अतिशय महत्व आहे. रोजगारक्षमता, शिक्षण-अध्यापन व स्रोत, संशोधन, औद्योगिक उत्पादन व एकीकरण, प्लेसमेंट धोरण व सहकार्य, भविष्यवेधी मार्गदर्शन, बाह्यधारणा व आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन या सात कामगिरीच्या निर्देशांवर आधारित ही क्रमवारी ठरवली जाते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्त कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नतेने बॅचलर ऑफ फिजिओथेरपी अभ्यासक्रम, तर महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परीक्षा मंडळ संलग्नित डिप्लोमा इन फिजिओथेरपी, डिप्लोमा इन नॅचरोपॅथी यासह नर्सिंग केअर, डेंटल असिस्टंट आणि ऑपथाल्मीक टेक्निशियन हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात. इथे परस्परसंवादी, अनुभवात्मक, सहयोगी आणि वैचारिक शिक्षणाच्या अद्वितीय अध्यापनशास्त्राचे अनुसरण करते. नियमित शिक्षणाबरोबरच, हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्याधारित शिक्षणाचे उपक्रम राबवते. योगा, ध्यानधारणा, परकीय भाषा, सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्व विकास, संज्ञानात्मक शिक्षण, नवकल्पना आणि इन्क्युबेशनसाठी प्रोत्साहित केले जाते.”
“आरोग्य विज्ञान क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इथे अत्याधुनिक पायाभूत सुविधा आहेत. विद्यार्थ्याना अनुभव आणि प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे, यासाठी शहरातील विविध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसोबत सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. फिजिओथेरपी आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांना क्लिनिकल प्रशिक्षण घेण्याची संधी मिळते. संस्थेमध्ये ऑस्टियोपॅथी, निसर्गोपचार, पोषण आणि आहारशास्त्र, पॅरामेडिकल, एक्यूप्रेशर, अॅक्युपंक्चर, कोअर फिजिओ इत्यादी वैकल्पिक उपचारांवरील विविध कार्यशाळांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना मस्कुलोस्केलेटल स्थिती, न्यूरोलॉजिकल स्थिती, बालरोगविषयक परिस्थिती आणि पुनर्वसन यातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फिजिओथेरपी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते,” असेही त्यांनी नमूद केले.
रुग्णांना जीवनशैलीतील बदल, पोषण, योग आणि ध्यान, आरोग्य आणि फिटनेस क्रियाकलाप, तणाव व्यवस्थापन, सकारात्मक विचार, व्यसनमुक्ती, योग्य शरीर मुद्रा इत्यादींबद्दल समुपदेशन आणि मार्गदर्शन करून शस्त्रक्रियेशिवाय बरे करण्यासाठी संस्था प्रयत्न करते. हे रुग्णांना वेदना, संतुलन, गतिशीलता आणि मोटर फंक्शन व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी कार्य करते. हे भविष्यात दुखापत किंवा आजार होण्याचा धोका कमी करण्यास देखील मदत करू शकते. थोडक्यात, फिजिओथेरपी एक समग्र दृष्टीकोन असलेली चिकित्सा असून, त्यामध्ये रुग्ण स्वतःची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करतो. आमचे फिजिओथेरपी कॉलेज सुसज्ज आणि उत्तम पायाभूत सुविधांनी युक्त आहे. शैक्षणिक व्यतिरिक्त, आमचे विद्यार्थी रक्तदान, कर्करोग जनजागृती आणि प्रतिबंध, ऑस्टियोपॅथी, दिव्यांग शिबिर, विविध सामाजिक रॅली अशा विविध शिबिरांमध्ये गुंतलेले आहेत. सर्वांसाठी सर्वांगीण शिक्षण हे आमचे ध्येय आहे, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सांगितले.