पुणे-‘साहित्य संचित’ आणि ‘शोध मराठी मनाचा २०२३’ या दोन महत्वपूर्ण व अमुल्य ग्रंथांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठाकर श्री. दामोदर मावजो (गोवा) यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी सायं. ४ वाजता पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृह, चौथा मजला, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे येथे संपन्न होणार आहे. पिंपरी येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील हे या दोन्ही महत्वपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते. त्यांच्याच पुढाकाराने हे अमुल्य ग्रंथ प्रकाशित होत आहेत.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे हे विशेष अतिथी म्हणून तसेच जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे व माजी कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. अमळनेर येथे फेब्रुवारी २०२४ मध्ये होणाऱ्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचा विशेष सत्कार डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते या वेळी होणार आहे. ग्रंथांच्या प्रकाशनाबरोबरच ई-बुक व संमेलनांच्या यू-ट्यूब चॅनल्सचे लोकार्पण देखील याप्रसंगी होईल.