पुणे – बाबुगेन,दगडूशेठ,नंतर मानाची समजली जाणारी गुरुवार पेठेतील जैन मंदिर चौक येथील स्वराज्य मित्र मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील गणेश मंडळाच्या पथकाने फोडली तसेच ५५५५५ रोख बक्षीस यावेळी मंडळाच्या वतीने देण्यात आले.
या वेळी उत्तर प्रदेश येथील तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरलेल्या शेरसिंह राणा यांनी विशेष उपस्थिती लावली..
हिंदुस्तानचे शेवटचे महापराक्रमी हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या अस्थी अफगाणिस्तानातील तालबानी राजवटीतून अत्यंत आदराने भारतात आणल्या आणि तालिबान्यांचे नेपाळ,पाकिस्तान, अफगाणिस्तान असा प्रवास करून उत्तर प्रदेशात महाराज पृथ्वीराज चौहान यांचे मंदिर बांधले या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना सांगितला.

पुण्यातील स्वराज्य मित्रमंडळाने प्रमुख पाहुणे म्हणून राणा यांना दहीहंडी कार्यक्रमाला निमंत्रित केले होते.त्या वेळी ते बोलत होते. मंडळाने यंदा २४व्या वर्षात पदार्पण केले.हनुमानाचा हलता देखावा प्रमुख आकर्षण होता तर तर परशुराम वाद्य पथकाने यावेळी स्थिर वादन करून गोपाळ भक्तांची मने जिंकली.या वेळी मंडळाचे अध्यक्ष विजय थोरवे व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.