पुणे- माफी मागितली हे फडणविसांच्या नेतृत्वाचे मोठेपणाचे लक्षण,पण जयंत पाटलांनी गृहमंत्र्यांच्या माफी प्रकरणाला वेगळे वळण दिले ,याबाबत त्यांनी केलेले वक्तव्य बालिश आहे असे मत माजी खासदार संजय काकडे यांनी येथे व्यक्त केले. ते म्हणाले जालन्याच्या लाठीमाराचा सर्व जन निषेध करत आहेत , पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे . आता याबात चौकशी करून दोषींवर कारवाई देखील होईल पण याबाबत राजकीय वक्तव्ये कोणी करायला नको आहेत असे काकडे म्हणाले.
…तर नितेश राणेंचाही निषेध –
शांत असलेल्या शहरात अशांतता निर्माण करणारी वक्तव्ये जर आमदार नितेश राणे आणि महेश लांडगे किंवा कोणत्याही नेत्यांनी केली असतील तर आपण त्या वक्तव्यांचा निषेध करतो , आणि वर आपलेच गृहमंत्री बसलेत , आपल्याला कोणी काही करणार नाही अशी बालिश वक्तव्ये करून भाजपबद्दल संभ्रमित,मलीन प्रतिमा पसरविण्याच्या प्रयत्नांना आपला विरोधच असेल असे मत आज भाजपचे राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी ,माजी खासदार संजय काकडे यांनी येथे माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना व्यक्त केले. पुण्येश्वर मंदिर प्रश्नावरून तेथील अतिक्रमणा वरून माजी महापौर मुरलीधर मोहोळ , भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांना घेऊन आमदार नितेश राणे आणि आमदार महेश लांडगे यांनी येथे आंदोलन केले यावेळी राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले .आणि शहर भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांत , नेत्यांत अस्वस्थता पसरली या पार्श्वभूमीवर आज संजय काकडे यांना माध्यम प्रतिनिधी यांनी छेडले असता ते म्हणाले ,महापालिका अधिकारी कायदेशीर काम करतील , त्यांच्याकडून ते करवून घेताही येते त्यासाठी चुकीची वक्तव्ये करणे योग्य नाही ,आणि पुण्यात हिंदू मुस्लीम ऐक्याचे वातावरण आहे ते कोणी तोडू शकत नाही बाहेरून कोणी नेते आले तर स्थानिक नेते म्हणून त्यांचे स्वागत केले जाते मात्र त्यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेशी स्थानिक नेते सहमतच असू शकतील असे मात्र नाही .राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी गृहमंत्री फडणवीस यांना लाठीमाराबद्दल जबाबदार धरणे अत्यंत चुकीचे असून या संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आपण निषेध करतो असेही काकडे यांनी प्रथम नमूद केले .