पुणे-प्रियदर्शनी वुमन्स फोरम आणि बिटिया फाउंडेशन तर्फे दरवर्षी प्रमाणे गौरी गणपती साहित्य जत्रा याही वर्षी भरवण्यात येणार आहे.अशी माहिती संयोजिका संगीता तिवारी यांनी येथे दिली ,त्या म्हणाल्या,’ वाती ते मूर्ती सर्व काही एका छताखाली. बचत गटा माध्यमातून आणि महिला स्वयंरोजगार या व्याख्येतून गेले तेरा वर्ष आपण ही जत्रा काँग्रेस भवन च्या पटांगणामध्ये भरवीत असतो.ह्या वर्षीही जत्रा 10ते 17 सप्टेंबर पर्यंत भरणार आहे. 10 तारखेला रविवारी दुपारी 4.30 वाजता या जत्रेचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, सिने तारका स्मिता गोंदकर, आरती शिंदे, पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, हे उपस्थित राहणार आहेत. आपली ही संकल्पना एका जागी गौरी गणपतीचे सर्व साहित्य मिळावे ही आहे. रस्त्यावरील गर्दी,प्रचंड वाहतूक कोंडी, कधी ऊन कधी पाऊस अशा स्थितीत जर लोकांना पुणेकरांना खास करून एका जागी सर्व काही पूजेचे साहित्य पासून मूर्तीपर्यंत सर्वकाही एका जागी अशी आहे. आणि त्यातून महिलांना आर्थिक उत्पन्न ही मिळेल. आम्ही आठ दिवस ही जत्रा ठेवलेली आहे. आठी दिवस रोज सायंकाळी वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात उद्घाटनाच्या दिवशी गणेश वंदना आणि मी सावित्री बोलते या कार्यक्रमाने होणार आहे. त्यानंतर मंगळागौर कार्यक्रम , फॅशन शो,नववारी फॅशन शो, लहान मुलांचा टॅलेंट शो तसेच बॉलीवूड गाण्यांचा ऑर्केस्ट्रा असे मोफत कार्यक्रम ठेवलेले आहेत. दररोज तीन लकी ड्रॉ खरेदी करणाऱ्यांसाठी काढण्यात येणार आहे. 16 तारखेला शुक्रवारी मिड नाईट मार्केट म्हणजे रात्री उशिरापर्यंत चालणारे मार्केट ठेवले आहे.असेही तिवारी यांनी सांगितले.