विश्वहिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नारायण बाबलानी; जी २० इंटरफेथ फोरमचा समारोप
पुणे, दि.८ सप्टेंबर – ‘भारताने इतिहासातील प्रत्येक धर्माची संस्कृती, त्यांच्या देशातील प्रतिनिधित्व दर्शविणाऱ्या वास्तू जोपासल्या आहेत. या देशाने कायमच आपल्या विविधतेतील एकतेमधून जगाला शांतीचा संदेश दिला आहे,’ असे मत विश्वहिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नारायण बाबलाणी यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, जी २० इंटरफेथ अलायन्स फॉर सेफर कम्युनिटीज आणि यूएस येथील जी २० इंटरफेथ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने राजबाग लोणी काळभोर येथील जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटामध्ये आयोजित ‘जी २० इंटरफेथ समिट’च्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी, यूएसए येथील जी२० इंटरफेथ फोरमचे अध्यक्ष डब्ल्यू कोल दुरहाम, हमद अल हम्मदी, मतियस हो,युयुन वाह्यूनिंग्रम ,
मिचेल युंग ,फराझ हाशमी ,डॉ. अशोक जोशी, रोडरिगो वितोरीनो सोझा अल्वेस व इवो पेरेरा दा सिल्वा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
तसेच एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड, एमअआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ.आर एम चिटणीस व प्रकुलगुरु डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
यावेळी, पुढील वर्षी ब्राझील येथे होणाऱ्या २०२४ जी २० इंटरफेथ फोरमसाठी ध्वज व ऊर्जेची मशाल प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांनी ब्राझिलियन शिष्टमंडळाकडे सुपूर्द केली.
बाबलानी पुढे म्हणाले, दरवर्षी जोपासलेली ही संस्कृती पाहण्यासाठी जगभरातून असंख्य पर्यटक देशात येतात आणि परत जातांना
शांतीचा संदेश घेऊन जातात. सर्व धर्मांची संस्कृती कशी जोपासावी याचे उत्तम उदाहरण भारताने जगाला दाखवले आहे.
डब्ल्यू कोल दुरहाम म्हणाले, एमआयटी संकुलातील ही तीन दिवसीय परिषद समृध्द करणारी होती. माझ्या सत्कारात दिलेला महात्मा गांधी यांचा पुतळा विश्व शांतीचा हा संदेश मला जगभर पोहचविण्यासाठी प्रवृत्त करणारा आहे. एमआयटीने केलेल्या पाहून चाराने आम्ही भारावून गेलो आहोत.
पुढील वर्षी ब्राझीलमध्ये होणाऱ्या जी -२० परिषदेचे अध्यक्ष रोडरिगो वितोरीनो सोझा अल्वेस यावेळी बोलताना म्हणाले की, एमआयटी ने केलेल्या या सुंदर आयोजनामुळे नक्कीच आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. तरी आम्ही सर्वांना पुढील वर्षासाठीच्या शिखर परिषदेसाठी आमंत्रित कर इच्छितो. आम्ही एमआयटी प्रमाणेच सर्वांचा पाहुणचार करण्यासाठी उत्सुक आहोत.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. मिलींद पांडे यांनी आभार मानले.
प्रा.दुरहाम यांना रोबिंग आंतरराष्ट्रीय शांती दूत पुरस्कार
प्रा.दूरहम यांना त्यांनी केलेल्या विश्वशांतीच्या कार्यक्रमासाठी रोबिंग आंतरराष्ट्रीय शांतिदूत पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी त्यांचा प्रशस्तीपत्रक व मानपत्र देऊन गौरव केला व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.