पुणे-भारत सरकारच्या पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाद्वारे (MOEFCC) देशस्तरावर National Clean Air Program (NCAP) राबविण्यात येत आहे. जागतिक स्तरावर UNEP ने जाहीर केलेल्या ‘International Day Of Clean Air For Blue Skies’ नुसार काल दि. ०७ सप्टेंबर २०२३ रोजी पुणे महानगरपालिकेतर्फे विविध जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. पुणे महानगरपालिकेतर्फे ‘Together For Clean Air’ या थीम नुसार हवा प्रदूषण जनजागृतीबाबत (Signature Campaign) हा उपक्रम सकाळी १०.०० वाजता पुणे महानगरपालिका मुख्य इमारत येथील द्वार मंडप पोर्च येथे राबविण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये हवा प्रदूषणसाठी कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रतिज्ञावर स्वाक्षरी मोहिमेअंतर्गत महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), (वि), (इ) व विविध खातेप्रमुख यांच्या स्वाक्षरीने सुरुवात करण्यात आली. हवा प्रदूषणबाबतचे व्हिडिओ क्लिप महानगरपालिकेतील द्वार मंडप पोर्च येथील स्क्रीन वर दाखविण्यात आले तसेच सदरचे व्हिडीओ क्लिप स्मार्ट सिटी चे १५० पेक्षा जास्त LED बोर्ड वर व्हिडीओ दाखविण्यात येत आहे.
तसेच, त्याचबरोबर कात्रज प्राणीसंग्रहालय, इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र व भारती विद्यापीठ येथील पर्यावरण विभाग यांसारख्या ठिकाणी (Signature Campaign) व (Selfi Corner) हा कार्यक्रम राबविण्यात आला. इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे AISSMS पॉलिटेकनिक चे विद्यार्थी व शिक्षकांकरीता एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.अशी माहिती उपयुक्त पर्यावरण विभाग माधव जगताप यांनी दिलीआणि या पुढील काळात पर्यावरण चे विविध कार्यक्रम पुणे शहरात राबविण्यात येणार आहेत.