पुणे- महानगरपालिकेच्या हद्दीत अतिक्रमण विरोधातील कारवाई जोरात सुरू आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये अतिक्रमण केलेल्या घरांवर, दुकानांवर, हॉटेलवर कारवाई करण्यात येत आहे. शहरात सगळीकडे अतिक्रमणकारवाई जोरात सुरू आहे. पुणे महापालिकेने काल गुरुवारी (दि.7) शिवाजीनगर येथील दोन हॉटेलवर कारवाई करुन 5200 चौरस फुट जागा मोकळी केली आहे.
पुणे महापालिकेने अतिक्रमण करणाऱ्या शिवाजीनगर परिसरातील हॉटेल फाऊंटन आणि बांबू हाऊस या दोन हॉटेलवर कारवाई केली. या कारवाईत पालिकेने 5200 चौरस फुट जागा मोकळी केली आहे. कारवाईमध्ये गॅस कटर, बिगारी यांचा वापर करण्यात आला होता. महानगरपालिकेची हॉटल वरील कारवाईचा धडाका कायम आहे.
या कारवाईमध्ये कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे ,उपअभियंता सुनिल कदम शाखा अभियंता राहुल रसाळे, समीर गडई यांनी सहभाग घेतला.पुणे महानगर पालिकेकडून मोठा फौजफाटा घेऊन ही अतिक्रमणे काढली जात आहेत.