पुणे | पुण्यामध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गाण्यांच्या तालावर तरुणाई थिरकत होती. अशा उत्साहाच्या वातावरणात नेतेही त्यात सहभागी झालेले पाहायला मिळाले. माजी खासदार आणि भाजपाचे नेते संजय काकडे यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरलेला पाहायला मिळाला.
श्री कडबे आळी तालीम मंडळाच्या दहीहंडी उत्सवाला माजी खासदार संजय काकडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी गोविंदा पथक, लहान मुलं आणि युवा पिढीचा उत्साह पाहण्यासारखा होता. समोर असलेली गर्दी आणि गाण्यांच्या तालावर त्यांनी धरलेला ठेका यामध्ये माजी खासदार काकडे देखील सहभागी झाले आणि त्यांनीही गाण्याच्या तालावर ठेका धरला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अमित पळसकर, कार्याध्यक्ष धनंजय डिंबळे व जितेंद्र भामे आदी मान्यवरांनी माजी खासदार संजय काकडे यांचे स्वागत केले.