पुणे–काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मिर पर्यंत काढलेल्या भारत जोडो यात्रेला दि. ७ सप्टेंबर २०२३ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या ऐतिहासिक यात्रेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवाजीनगर भागातून भारत जोडो पदयात्रा काढून काँग्रेस भवन येथे आनंदोत्सव करण्यात आला.
या पदयात्रेचे नेतृत्व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. पदयात्रेमध्ये ‘नफरत छोडो भारत जोडो’, ‘डरो मत’, ‘देश की आँधी राहुल गांधी’, ‘विकास की आँधी राहुल गांधी’, ‘नफरत के बाजार मे मोहब्बत की दुकान’ अशा प्रकारच्या घोषणा अत्यंत उत्साहात कार्यकर्त्यांनी दिल्या.
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘घरगुती गॅस वरील २०० रूपयांची कपात म्हणजे जनतेला फसवण्यासाठी केलेले एक षडयंत्र आहे. मोदी सरकारच्या या षडयंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही पुणे शहरातील सर्व विधानसभा मतदार संघात ‘जनसंवाद’ यात्रेचे आयोजन केले आहे. ‘डेरो मत’, ‘नफरत छोडो’, ‘भारत जोडो’, चा संदेश देत गरिब, वंचित, शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण, व्यापारी, खेळाडू सर्व घटकांशी राहुलजी गांधी यांनी संवाद साधत देशातील वातावरण बदलून टाकले. कन्याकुमारी ते काश्मीर या ४ हजार किलोमीटर पदयात्रेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही आज भारत जोडा पदयात्रा काढून आंनदोत्सव करीत आहोत.’’
यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांची भाषणे झाली.
यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे, अजित दरेकर, रजनी त्रिभुवन, सिमा सावंत, सोनाली मारणे, रजिया बल्लारी, माया डुरे, उषा राजगुरू, मेहबुब नदाफ, राजेंद्र पडवळ, शिलार रतनगिरी, शारदा वीर, लता घडसिंग, मुख्तार शेख, राहुल शिरसाट, रमेश सोनकांबळे, रविंद्र माझीरे, हेमंत राजभोज, अजित जाधव, दिलीप तुपे, सुरेश नांगरे, बाबा सय्यद, सचिन बहिरट, विजय तिकोणे, प्रकाश पवार, राज गेलोत, जयकुमार ठोंबरे, दिपक ओव्हाळ, लतेंद्र भिंगारे आदींसह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.