शाखेमध्ये एटीएम– कम– कॅश रिसायकलर मशिन (सीआरएम), २४x७ उपलब्ध
पुणे – आयसीआयसीआय बँकेने पुण्यातील बाणेर येथे नवी शाखा सुरू केली आहे. ही बँकेची या शहरातील १०० वी शाखा आहे. पॅनकार्ड क्लब रस्ता येथे वसलेल्या या शाखेत एटीएम कम कॅश रिसायकलर मशिन (सीआरएम) बसवण्यात आले असून त्यामुळे ग्राहकांना पैसे भरणे तसेच काढण्याची सेवा मिळणार आहे.
आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक श्री. राकेश झा यांनी या शाखेचे उद्घाटन केले. शाखेचे उद्घाटन करताना ते म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत १०० वी शाखा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहकांना आमची डिजिटल व ग्राहकस्नेही उत्पादने व सेवा आवडतील असा विश्वास वाटतो. संपूर्ण शहर सणासुदीच्या हंगामासाठी सज्ज होत असताना ग्राहक, व्यवसाय आणि कॉर्पोरेट्सना सुविधा देण्यासाठी आणि त्यांच्या बँकिंग व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उत्सुक आहोत.’
या शाखेद्वारे विविध प्रकारची खाती, ठेवी आणि कर्ज, बचत व करंट खाती, निश्चित आणि आवर्त ठेवी, व्यावसायिक कर्ज, गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, सुवर्ण कर्ज, परकीय विनिमय सेवा तसेच कार्ड सेवा दिली जाणार आहे. बँकेद्वारे एनआरआय ग्राहकांनाही सेवा दिली जाणार आहे. या शाखेमध्ये लॉकर सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. या शाखेच्या कामकाजाची वेळ सकाळी ९.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असून ही शाखा सोमवार ते शुक्रवार आणि पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या शनिवारी सुरू राहील.
शाखेमध्ये टॅब बँकिंग सुविधा आहे, ज्याअंतर्गत कर्मचारी टॅब्लेट उपकरणाच्या मदतीने ग्राहकाच्या घरी किमान १०० सेवा देतील. त्यामध्ये खाती सुरू करणे, निश्चित ठेवी (एफडी), चेकबुक मिळण्यासाठी विनंती दाखल करणे, ई- स्टेटमेंट तयार करणे व पत्ता बदलणे यांचा समावेश आहे.
बँकेच्या नेटवर्कमध्ये महाराष्ट्रातील ८५० शाखा व २९०० एटीएम्स तसेच कॅश रिसायकलिंग मशिन्सचा (सीआरएम) समावेश आहे.