टाटा क्रूसिबल कॅम्पस क्विझ २०२३ – महाराष्ट्र क्लस्टर ११ फायनल्सची विजेती सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, पुण्याची रितिका बन्सल
पुणे7 सप्टेंबर 2023: भारतातील सर्वात प्रतिष्ठित बिझनेस क्विझ, टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझ २०२३ च्या क्लस्टर ११ च्या अंतिम फेरीत सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, पुणे येथील रितिका बन्सलने विजय मिळवला आहे.
महाराष्ट्र विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, क्लस्टर 11 ची अंतिम फेरी अतिशय अटीतटीची झाली. विजेतील ३५,००० रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले असून आता ती झोनल फायनलमध्ये भाग घेण्यास पात्र ठरला आहे. सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन, पुणे येथील चारू शर्माने उपविजेतेपदावर शिक्कामोर्तब करून १८,००० रुपयांचे रोख पारितोषिक जिंकले आहे.
या वर्षीच्या कॅम्पस क्विझसाठी, देशात २४ क्लस्टर्स तयार करण्यात आले आहेत आणि ऑनलाइन प्रिलिम्सच्या दोन लेव्हलनंतर, प्रत्येक क्लस्टरमधून टॉप १२ फायनलिस्ट वाइल्ड कार्ड फायनलसाठी आणि त्यापैकी टॉप ६ फायनलिस्टना २४ ऑनलाइन क्लस्टर फायनलसाठी निवडले गेले. हे २४ क्लस्टर दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि उत्तर अशा चार झोनमध्ये विभागलेले आहेत. प्रत्येक झोनमध्ये ६ क्लस्टर आहेत. झोनल फायनलही ऑनलाइन होत आहेत. राष्ट्रीय महाअंतिम फेरी मात्र ऑनलाइन होणार नाही, ती प्रत्यक्ष समोरासमोर आयोजित केली जाईल.
क्लस्टरच्या विजेत्या आणि उपविजेत्याला अनुक्रमे रु. ३५,000* आणि रु. १८,000* ची रोख बक्षिसे दिली जातील. चार झोनल अंतिम फेरीतील पहिल्या दोन विजेत्यांना राष्ट्रीय अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळेल.
राष्ट्रीय अंतिम फेरीमध्ये ८ स्पर्धक असतील, जे राष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठी स्पर्धा करतील. टाटा क्रूसिबल कॅम्पस क्विझच्या राष्ट्रीय विजेत्याला २.५* लाख रुपयांचे भव्य बक्षीस आणि प्रतिष्ठित टाटा क्रूसिबल ट्रॉफी दिली जाईल. या व्यतिरिक्त, या वर्षीचे राष्ट्रीय विजेते आणि राष्ट्रीय फायनलमधील दोन सर्वोच्च स्कोअरर्सना देखील टाटा समूहासोबत इंटर्नशिप* करण्याची संधी जिंकता येईल.
प्रसिद्ध क्विझमास्टर आणि टाटा क्रूसिबलचे दीर्घकाळ सहयोगी, ‘पिकब्रेन’ म्हणून नावाजले जाणारे, गिरी बालसुब्रमण्यम, क्विझमास्टर म्हणून काम पाहत आहेत, रश्मी फुर्टाडो त्यांच्यासोबत क्विझ को-होस्ट आहेत.
2004 मध्ये सुरू करण्यात आलेला टाटा क्रूसिबल हा टाटा समूहाचा एक ज्ञान उपक्रम आहे जो देशातील तरुणांना त्यांची क्विझिंग कौशल्ये दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करवून देतो, जिज्ञासा वाढवण्यासाठी आणि चाकोरीबाहेर पडून विचार करण्यासाठी प्रोत्साहन देतो.