पुणे दि. ६ : वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील येरवडा व चतु:श्रुंगी वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.
येरवडा वाहतूक विभागात बंडगार्डन पाणी पुरवठा विभागांतर्गत पाणी पुरवठा विभागांतर्गत येणारे वडगाव शेरी टँकर भरणा केंद्राच्या समोरील मुख्य रस्त्यावर भरणा केंद्राच्या गेटच्या उजव्या बाजूस १०० मीटर व डाव्या बाजूस १०० मीटर तसेच हरीगंगा सोसायटी इन गेटपासून उजव्या बाजूस ५० मीटर व आऊट गेटपासून डाव्या बाजूस ५० मीटर अंतरावर नो पार्किंग करण्यात येत आहे.
चतु:श्रुंगी वाहतूक विभागांतर्गत अन्नपुर्णा अपार्टमेंट चौक, तसेच ह्युंडाई चौक व बुलढाणा अर्बन को. ऑ. बँक पर्यंत चौकात दोन्ही बाजूस प्रवेश ठिकाणावर ५ मीटर पर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे. रॉयल होम्स लॅण्डमार्क ते सिल्वन हाईट्स बिल्डींग क्र. जी पर्यंत अंदाजे १५० मीटर लांबीच्या रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस पी १ पी २ पार्कींग करण्यात येत आहे. चौंधे पार्क समोरील वास्तु सुंदर सहकारी गृहरचना गेट क्र. १ च्या डाव्या व उजव्या बाजूस १० मीटर पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस तसेच एन्क्लेव बिल्डींग समोरील गेट क्र. २ च्या डाव्या व उजव्या बाजूस १० मीटर पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्कंग करण्यात येत आहे.
वाहतूक बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास त्या पोलीस उप आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात २० सप्टेंबर पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे उप आयुक्त वाहतूक, पुणे शहर विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.