पुणे-पुणे फेस्टिव्हल अंतर्गत दरवर्षीप्रमाणेआकृती या नावाने फक्त महिला चित्रकारांचे चित्र प्रदर्शन” व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे यंदाचे चौदावे वर्ष आहे.
लोकसभेच्या खासदार व स्वप्नसुंदरी हेमा मालिनी यांच्या हस्ते महिला उत्सवाचे उद्घाटना अंतर्गत या चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 23 सप्टेंबर सकाळी 11 वाजता बालगंधर्व कलादालन येथे होणार आहे.
- हेमा मालिनी यांचे पोट्रेट
- किंवा त्यांच्या कोणत्याही चित्रपटाचे पोस्टर.
असे दोन विषय स्पर्धेसाठी दिलेले आहे आहेत.
स्पर्धेमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व चित्रांचे प्रदर्शन तीन दिवस म्हणजेच 25 सप्टेंबर पर्यंत भरवण्यात येणार आहे. हेमा मालिनी यांच्या पोट्रेट व्यतिरिक्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शंभर चित्र प्रदर्शनात मांडली जातील.
यामध्ये पेन्सिल स्केच, चार्कॉल, ऍक्रेलिक कलर, ऑइल पेंट, वॉटर कलर अशा सर्व माध्यमातून १८ x २२ पासून
२२ x ३० इंच साइजच्या कॅनव्हास पर्यंत चित्र प्रदर्शित होणार आहेत.
त्याचप्रमाणे हेमामालिनी यांचे ऑइल पेंट व वॉटर कलर अशा दोन्ही माध्यमातून लाईव्ह पोट्रेट काही काढले जाणार आहे.
यंदाच्या वर्षी या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे, ‘आकृती’ ग्रुपच्या पंजाब, हरियाणा, केरळ, उत्तरप्रदेश, उत्तराखंड अशा
वेगवेगळ्या राज्यातून
आलेल्या 50 महिला चित्रकार,
साधारण ८ फुट उभा व १८ फुट आडवा, कॅनव्हास वर,
पुणे फेस्टिवल चा प्रसिद्ध ‘गणेशाची प्रतिमा’ असलेला लोगो, हाताने पेंट करून दोन्ही बाजूला चार चार असे अष्टविनायकाच्या प्रतिमा पेंटकरून ‘पुणे फेस्टिवल’ ला भेट म्हणून देणार आहेत.

व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल स्पर्धा
पुणे फेस्टिवल अंतर्गत गेले बारा वर्षे “Voice of Pune festival”..या ‘महिला व पुरुषांसाठी’ हिंदी सुगम स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. स्पर्धेचे हे तेरावे वर्ष आहे.
यामध्ये वय वर्ष १८ ते ४० व ४० च्या पुढील महिला व पुरुष असे चार गट केलेले आहेत.
प्रत्येक गटात तीन व उत्तेजनार्थ दोन अशी एकूण १४ ते१५ बक्षिसे काढली जातात. व
बक्षीस मिळालेल्यांमधून सर्व स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट गायक व
सर्वोत्कृष्ट गायिका यांस voice of Pune festival असे अवॉर्ड दिले जाते.
यंदाचे वर्षी दिनांक १६ व १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ अशा वेळात ‘M स्टुडिओ’ मुकुंद नगर येथे या स्पर्धेची प्रथम फेरी घेतली जाणार आहे. त्यासाठी २ शास्त्रीय संगीत तज्ञ व १ सुगम संगीत तज्ञ अशा तीन परीक्षकांचे पॅनल असणार आहेत. व अंतिम फेरीसाठी या तीन परीक्षकां व्यतिरिक्त आणखी दोन परीक्षकांचे पॅनल असणार आहे.
*प्रथम फेरी कराओके ट्रॅक्स बरोबर व अंतिम फेरी वाद्य वृंदासहित आहे.
पुणे फेस्टिवल करंडक
यावर्षी खास कॉलेजच्या मुलांसाठी एक वेगळा गट करून त्यामध्ये अंतर महाविद्यालयीन मुला मुलींच्या स्पर्धा घेऊन, उत्तम सादरीकरण केलेल्या कॉलेजला पुणे फेस्टिवल करंडक देण्यात येईल. हा फिरता करंडक असून विजेत्या कॉलेज कडे हा करंडक वर्षभर राहील. आणि सलग पाच वर्ष ज्या कॉलेजकडे करंडक राहील त्या कॉलेजकडे तो करंडक कायमस्वरूपी दिला जाईल.
अंतिम फेरीसाठी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी मंजिरी ताई आलेगावकर व संगीतकार अविनाश विश्वजीत उपस्थित असणार आहेत. व प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क:
Advocate अनुराधा भारती
इव्हेंट ऑर्गनायझर
पुणे फेस्टिवल
rajlaibharati@yahoo.com
9422078956