पुणे-‘वर्षा, ईर्ष्या आणि गोहत्ती’ पुस्तक प्रकाशन आणि राजकीय भाष्यकारांबरोबर दिलखुलास संवाद कार्यक्रमाचे आयोजन
ज्येष्ठ राजकीय भाष्यकार (वात्रटिकाकार) रामदास फुटाणे यांनी लिहिलेल्या ‘वर्षा, ईर्ष्या आणि गोहत्ती’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, दिनांक १० सप्टेंबर रोजी सायं. ५.३० वाजता एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक, येथे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कोल्हापूरचे ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. मंगळवेढा येथील ‘शब्दशिवार प्रकाशन’ने याचे प्रकाशन केले आहे अशी माहिती प्रकाशक इंद्रजित घुले यांनी दिली. या सोबतच उपहास, व्यंग आणि विडंबनातून वर्तमान राजकारण आणि समाजकारणावर स्तंभलेखनातून भाष्य करणारे प्रवीण टोकेकर (ब्रिटिश नंदी), श्रीकांत बोजेवार (तंबी दुराई) आणि भाष्यकवी रामदास फुटाणे यांच्याशी मुक्त संवाद याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे
कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी साधणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी आवर्जून यावे असे आव्हान प्रकाशक इंद्रजित घुले यांनी केले आहे.