पुणे-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पर्वती मतदार संघातील नेते नितीन कदम आणि नितीन जाधव ,अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, फईम शेख, सुजित जगताप, प्रसाद खंडाळे, स्वप्निल खिलारे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गणेशोत्सव काळात पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही उपाययोजना सुचविल्या आहेत आणि त्या राबविण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात नितीन कदम म्हणाले कि,’पुणे शहरात साजरा होणारा गणेशोत्सव जागतिक पातळीवर पोहचला असून गणेशोत्सव काळात गणेश भक्त, नागरिक मोठ्या संख्येने पुणे शहराच्या मध्यवस्ती असलेल्या पेठांमध्ये येत असतात. या काळात पुणेकरांना बाहुतक कोंडीचा सामना करावा लागत असून आपण पुढील उपाययोजना केल्यास काही प्रमाणात त्यातून सुटका होऊ शकते.
१) शिक्षण विभागाशी संपर्क करून शाळा, महाविद्यालये सकाळ व दुपार सत्राचे नियोजन करून म्हणजेच दुपारी ४ वाजता सोडण्यात याव्यात.
२) सर्व पेठांमधील शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालय यांचे पार्किंग सायं. ५ ते रात्री १ पर्यंत गणेश भक्तांना वाहन पार्किंग साठी उपलब्ध करून देणे जेणेकरून रस्त्यावर पार्किंगचा प्रश्न निर्माण होणार नाही.
(3) PMPML सोबत संपर्क करून पेठ भागातील रस्त्यांवर लहान आकाराच्या बसेस प्रवाश्यांकरिता उपलब्ध करून द्याव्यात.
गर्दीच्या व वर्दळीच्या ठिकाणी जास्तीचे वाहतूक कर्मचारी व वॉर्डन उपलब्ध करून द्यावेत.