पुणे-यंदा ३५ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये महिला महोत्सव अंतर्गत महिलांसाठीच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विवाहित महिलांसाठी ‘मिसेस पुणे फे स्टिव्हल’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आहे. यात २६ ते ३६ व ३७ ते ५० हे दोन वयोगट असणार आहेत. प्रत्येक गटात विजेती व २ उपविजेत्या असणार आहे. अंतिम फेरी दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. याची निवडफेरी दिनांक ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ पासून सुरू होणार आहे. संयोजिका अॅड. अमृता जगधने ९६३७७५८९०६ यांना इच्छुक विवाहित महिलांनी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे फेस्टिवल महिला महोत्सव २०२३ अंतर्गत पाककला स्पर्धा देखील सोमवार, दिनांक २५ सप्टेंबर वेळ १२ ते ५ स्थळ- ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, शिवाजी नगर, येथे होणार आहेत . यात २ विभाग आहेत १ महिला आणि २. हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थी. ; विषय भरड धान्य वापरून पदार्थ. भरड धान्य ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, वरई/ भगर, राळं इत्यादी पैकी कोणताही एक अथवा मिक्स भरड वापरून पदार्थ बनवणे. विभाग २ गोड आणि तिखट स्पर्धेस मुक्त प्रवेश प्रवेशाची अंतिम तारीख २० सप्टेंबर आहे. नियम / अटी – पदार्थ १२ ते १.३० या वेळेत मांडायचा आहे. – पदार्थ झाकलेला असावा. -सजावटी साठी खाण्यायोग्य (Edible ) जिन्नसच वापरावेत. – पदार्थांची चव, पौष्टिकता, नाविन्य, सादरीकरण आणि स्वच्छता गृहीत धरले जाणार आहेत. – पदार्थासोबत थोडक्यात लिहिलेली पाककृती असावी ज्यामध्ये वापरलेले जिन्नस आणि प्रमाणाचा उल्लेख असावा. परीक्षकांचा निर्णय अंतिम असणार आहे या स्पर्धेच्या संयोजिका करुणा पाटील संपर्क – ९८६०४०२७८० या आहेत .