पुणे-आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे यासाठी आज डेक्कन, गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. देशातील पहिली मुलींची शाळा ज्यांनी भिडेवाडा येथे सुरु केली. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात शैक्षणिक क्रांती उदयास आली. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोलाचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले आहे. त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात अनेक महिला या आघाडीवर आहेत. याचे सर्व श्रेय हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. स्त्री वर्गाच्या उन्नतीसाठी आपले जीवनकार्य अर्पण केले अश्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळणे म्हणजे त्या पुरस्कराची उंची अधिक वाढणे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळेपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करणार आणि त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. अजितदादा पवार यांच्या सहकार्याने देशाचे पंतप्रधान ना.श्री. नरेंद्रजी मोदी, राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देऊन भारतरत्न पुरस्कार मिळेपर्यंत पाठपुरावा करत राहणार आहे. ही एक चळवळ आहे जो पर्यंत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळत नाही तो पर्यंत ही चळवळ चालूच राहणार आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन पत्रक वाटप करून, निवेदन देऊन स्वाक्षरी मोहीम घेणार आहे, असे मनोगत या मोहिमेप्रसंगी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी व्यक्त केले.
जागर स्त्री शिक्षणाचा सावित्रींच्या लेकींचा या अभियानाअंतर्गत पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा पुजा झोळे, कार्याध्यक्ष मयुरी तोडकर, लावण्या शिंदे व युवती पदाधिकारी, कार्यकर्त्या यांनी अतिशय चांगल्याप्रकारे स्वाक्षरी मोहीम कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, महिला अध्यक्षा प्रिया गदादे, युवती अध्यक्षा पुजा झोळे, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, प्रदेश युवक महेश हांडे, अल्पसंख्याक अध्यक्ष समीर शेख, दिव्यांग अध्यक्ष पंकज साठे, ओ.बी.सी. कार्याध्यक्ष रुपेश आखाडे, कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, खडकवासला विधानसभा अध्यक्ष प्रदीप धुमाळ, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष अभिषेक बोके, पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे, महिला कार्याध्यक्ष गौरी जाधव, सांस्कृतिक कार्याध्यक्ष अशोक जाधव, बाळासाहेब बोडके, संतोष फरांदे, दयानंद इरकल, अर्चना चंदनशिवे, वासंती काकडे, डॉ. सुनिता मोरे, गोरखनाथ भिकुले, शिवाजी पाडळे, शालिनी जगताप, तरनुम जमादार,विजया भोसले, मोनिका काळे, शशिकांत जगताप, विपुल म्हैसूरकर, बाळासाहेब आहेर, प्रदीप पवार, चित्रलेखा दाभेकर, माधवी मोरे, रुहीसबा सय्यद, नीता गायकवाड, रोहिणी क्षीरसागर, सुलक्षणा भोसले, तृप्ती जगताप, कांता खिलारे, बायडाबाई पाटील, किरण आबनावे, पुजा जाधव, निकिता भंडारे, श्वेता मिस्त्री, सोनू थोरवे, नयन गायकवाड, राहू सोनवणे, कृष्णा पाटोळे, भाग्यश्री भोईर, प्राजक्ता दळवी, नवनाथ खिलारे, शाम शेळके, विजय बाबर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.