पुणे, 5 सप्टेंबर 2023
सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी ), पुणे च्या वर्षभर चाललेल्या अमृत महोत्सवी सोहळ्याचा एक भाग म्हणून केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी एएफएमसी , पुणे च्या असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया (एपीआय ) चॅप्टरचा प्रारंभ केला तसेच “वैद्यकीय क्षेत्रातील उदयोन्मुख कल ” यावरील एपीआय-एएफएमएस कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन (सीएमई) च्या पहिल्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन केले.

एएफएमसी, पुणे ही एम्स, दिल्ली अस्तित्वात येण्यापूर्वी केंद्र सरकारची वैद्यकीय शिक्षणाची पहिली संस्था होती असे सांगत डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की स्वतंत्र एएफएमसीची कल्पना अन्य कोणाकडूनही नव्हे तर खुद्द डॉ बीसी रॉय यांनी मांडली होती ज्यांना असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया (एपीआय ) या संस्थेला मोठे करण्याचे श्रेयही जाते.
04JE.jpeg)

सहकार्यात्मक संशोधन आणि प्रशिक्षणासाठीच्या आंतर-मंत्रालयीन सहकार्यावरील या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी जैव तंत्रज्ञान विभाग आणि एएफएमसी एकत्र आल्याबद्दल अभिनंदन करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, सैन्यातील जवानांचे आरोग्य, सुरक्षा आणि कामगिरी सुनिश्चित करण्यात बायोटेक ऍप्लिकेशन्स वैविध्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण आहेत.

“अमृत काळातील अर्थव्यवस्थेसाठी तसेच भारताला जगातील आघाडीचे राष्ट्र बनवण्यासाठी देखील जैवतंत्रज्ञान ही गुरुकिल्ली ठरेल. जैवतंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या 9 वर्षात वेगाने वाढ झाली आहे आणि आता भारताचा उल्लेख जगातील अव्वल 12 जैवतंत्रज्ञान देशांमध्ये केला जात आहे.