पोलिसांनी दोन्ही आमदारांवर स्वतःहून गुन्हा दाखल करून कारवाई का केली नाही – एकंदरीत सर्वत्र सूर पण पोलीस मात्र यापासून दूर
पुणे- पुण्यातील मशीद पाडायच्या वल्गना करत तुम्ही पुण्याबाहेरून इथे आलात , इथले तुमचे नेते गप गप तुमच्या मागे मागे फिरतील ..पण हि पुणे महापालिका आहे ,इथे अधिकारी आणि कर्मचारी वर्गाबाबत बोलताना शब्द जपून वापरा , धमक्या इकडे चालणार नाही आणि शिवराळ भाषाही चालणार नाही ..तुम्हाला कायद्याची चाड नसेल पण आम्हाला आहे … तेव्हा जपून.. अशा आशयाचा सोज्वळ सल्ला चर्चेतून दिलेल्या पुणे महापलिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज शांततेत आंदोलन करत आमदार नितेश राणे आणि महेश लांडगे यांना सोज्वळ इशारा दिला आहे. लोकप्रतिनिधींनी कसे वागायचे असते याचे प्रशिक्षण अगोदर अशा नेत्यांना देणे गरजेचे आहे, त्यांच्यासाठी शिबिरे घेतली गेली पाहिजेत . मागण्या मांडताना कायदा विचारात घेऊन त्यापद्धतीने कायदा पाळून त्या मांडल्या पाहिजेत .तुम्ही अंगावर आलात तर तुम्हाला सहज कोणी अंगावर घेणार नाही तर सहज शिंगावर घेणारे येथे आहेत याची जाणीव असू द्यात असाही इशारा पुण्याच्या महापलिका वर्तुळातून दिला जातोय .कोणी यावे आणि महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना शिवराळ भाषेत धमकावून जावे हे आता पुरे झाले .. असा अंतिम निर्धार आता महापालिकेच्या वर्तुळातून होतो आहे .
नेमके काल आमदार नितेश राणे , आमदार महेश लांडगे यांनी आंदोलन कसे केले आणि यावेळी काय भाषण केले ते पहा आणि ऐका ……