पुणे-रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी वाहने चालविताना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे व इतर
वाहनचालक, पादचारी यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने वाहने चालविण्याचे आवाहन पीएमपीएमएल कडून
सर्व वाहनचालकांना करण्यात येत आहे.
पीएमपीएमएलच्या ड्रायव्हर सेवकांना बस चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणेबाबत व इतर
वाहनचालक तसेच पादचारी नागरिक यांना कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने बस चालविण्याबाबत सक्त
सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच दुचाकी, चारचाकी व इतर खाजगी वाहनचालक यांना देखील पीएमपीएमएल
कडून कळकळीचे आवाहन करण्यात येते की वाहने चालविताना वाहतूक नियमांचे पालन करा व इतर
वाहनचालकांचीही काळजी घ्या. जेणेकरून रस्त्यावर होणारे अपघात होणार नाहीत व परिणामी अपघातात होणारी
हानी देखील टाळली जाईल.
तसेच पीएमपीएमएलच्या बीआरटी मार्गिकेतून वाहने चालवून धोका पत्करणाऱ्या खाजगी वाहन चालकांना
देखील पीएमपीएमएल कडून आवाहन करण्यात येते की, बीआरटी मार्गिकेतून खाजगी वाहने चालवू नका. बीआरटी
मार्गिकेत अपघात होऊन काहींना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागते तर काहींना प्राणास मुकावे लागते. त्यामुळे
पीएमपीएमएल सर्व वाहनचालकांना आवाहन करते की वाहतूकीचे सर्व नियम पाळावेत.
इच्छित स्थळी लवकर पोहोचण्याची घाई करून अपघाताला आमंत्रण देण्यापेक्षा इच्छित स्थळी ५ ते १०
मिनिटे उशिरा पोहोचले तरी चालेल परंतु सुरक्षितपणे पोहोचले पाहिजे, याची खबरदारी सर्व वाहनचालकांनी घेणे
गरजेचे आहे. पीएमपीएमएल चे ड्रायव्हर व खाजगी वाहनधारक सर्वांनी मिळून वाहतुकीचे सर्व नियम तंतोतंत
पाळले तर इच्छित स्थळी आपण सुरक्षित व सुखरूप पोहोचू.