पुणे : सेऊल येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत आर. बी.होरांगीच्या खेळाडूंनी सहा सुवर्ण, ९ रौप्य आणि १८ कांस्यपदक मिळवून देशाचे नाव उंचावले. यासह पुण्यात नुकत्याच झालेल्या पहिल्या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत आर. बी .होरांगी तायक्वांदोच्या खेळाडूंनी २२ सुवर्ण, १६ रौप्य व २० कांस्यपदकाची कमाई करत स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले.
आर. बी. होरांगी तायक्वांदो दो-जांग असोसिएशन यांच्या वतीने चंदननगर-खराडी येथे नुकतीच ही स्पर्धा आयोजिली होती. या स्पर्धेत आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा, तेलंगणा, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातील पंधराशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. आर. बी. होरांगीचे ५० पेक्षा अधिक खेळाडू यामध्ये सहभागी झाले होते. आर. बी. होरांगीचे अध्यक्ष मास्टर रवींद्र भंडारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत माजी नगरसेवक योगेश मुळीक, माजी नगरसेविका शीतल शिंदे, सुनिता गलांडे, संजय गलांडे एकनाथ भंडारी, पोरित्रन शर्मा, तिरुपती भंडारी, बसवराज भंडारी यांनी उपस्थिती लावून सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी योगेश मुदलियार, श्रीनिवास केदगोनी, सारंग धोका, गिरीष पाटील, प्रशांत वांद्रे, विनोद बांगर, जयदेव पाल, किरण गायकवाड, आरती पसारकर, लिना पॉल, महेंद्र वानखेडे, विशाल गवते, शिवाजी भंडारी, गिरीष बागलकोट, प्रणव परमार, मनीषा विश्वकर्मा, माधुरी अनमल आणि वैष्णवी वांद्रे यांनी सहकार्य केले. स्पर्धेचे आयोजक कपिल अनमल आणि रवींद्र भंडारी यांनी सर्वांचे आभार मानले.