पुणे, दि. १९ : राज्य शासनाच्या वतीने शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२२-२३ च्या या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून नाव नोंदणी दि.२५ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून https://forms.gle/z5mw9A2dTu6J3zyNA या लिंकवर सुरू होणार आहे.
या पुरस्कारासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी दि. १५ जून २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पुणे यांनी केले आहे.
प्रस्तावासाठीच्या आवश्यक अटी : 1.शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक 2.मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गटशिक्षणाधिकारी /प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक 3.शिक्षक /मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान १० वर्षे आवश्यक 4.शिक्षकाचे /मुख्याध्यापकाचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल 5.विभागीय चौकशी सुरु नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र 6.शिक्षकांनी केलेल्या लगतच्या ५ वर्षाच्या सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाद्वारे करण्यात येईल 7.प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत 8.शिक्षकाच्या सेवेतील कार्यपद्धतीबाबत व निर्व्यसनी असलेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील