एसबीए कप बॅडमिंटन स्पर्धा, सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आयोजन
पुणे: गुरुप्रसाद राउत, आकाश भालेकर यांनी सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आणि पीडीएमबीएच्या सहकार्याने आयोजित योनेक्स-सनराईझ एसबीए कप कॉर्पोरेट बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
शिवाजीनगर येथील पीडीएमबीए मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे उद्घाटन पीडीएमबीएचे सचिव रणजित नातू यांच्या हस्ते झाले. या वेळी बायजूजचे विभागीय संचालक निशांत प्रियदर्शनी, मॅच पॉइंट सहसंस्थापकचे राहुल कौल, होस्टरोयलच्या संचालिका संपदा मेडसीकर, सुधांशू बॅडमिंटन अकादमीचे सुधांशू मेडसीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरुष एकेरीच्या तिस-या फेरीत गुरुप्रसाद राउतने कीर्तन सेरलाथनवर १५-८, १५-६ असा, आकाश भालेकरने ओम भावेवर १०-१५,१५-७, १५-८ असा विजय मिळवला. सुशांत पाटीलने पीनाक वाडीकरला १५-४, १५-५ असे, अथर्व घाणेकरने राजू ओव्हळला १५-१०, १५-५ असे नमविले. लोकेश जुंगिडने मुझामिल अन्सारीवर १५-७ , १५-७ अशी, तर हिमांशू मेहराने विपूल अन्वेकरवर १६-१४, ८-१५, १५-१२ अशी मात केली. आनंद साबूने हृषीकेश खाडिलकरवर १५-१३, १५-१२ असा विजय मिळवला.
जावेद, दिगांतची आगेकूच
स्पर्धेतील ४० वर्षांवरील पुरुष एकेरीच्या दुस-या फेरीत मधुसुदन मुदगलने जावेद शेखवर १५-१२, १५-१० असा विजय मिळवला. हसप्रित सहानीने राजू पिल्लईला १५-१३, १५-७ असे, तर सलील गाडगीळने पवन ठाकरेला १५-६, १५-११ असे नमविले. सांरग व्यासने अभिषेक जोशीवर १५-५, १५-११ असा, तर कुणाल लोकरेने सुदाम तांडलेवर १५-१३, १५-१० असा विजय मिळवला. दिगांत गुप्ताने सागर वैरागडेला १५-८ , १५-११ असे नमविले.
निकाल – पहिली फेरी – ३० वर्षांवरील पुरुष एकेरी – आनंद साबू वि. वि. योगेश गुंजाळ १५-८, १५-८, ओंकार केळकर वि. वि. चिराग देशपांडे १५-१३, १२-१५ , १५-३, शांतनू पाटील वि. वि. राहुल बांगर १५-७, १५-१२, देवेश सतवाणी वि. वि. जावेद शेख १५-१२, ६-१५, २१-१९, अनिकेत शुक्ला वि. वि. मेघराज जाधव १५-७ १५-९, विपूल अन्वेकर वि. वि. सिद्धान्त अमृतवार १५-१०, १५-५, सुशांत पाटील वि. वि. वरद सहस्त्रबुद्धे १५-१, १५-३.
३५ वर्षांवरील पुरुष एकेरी – दुसरी फेरी – आनंद साबू वि. वि. मेघराज जाधव १५-९, १५-७, सुदाम तांडले वि. वि. पुष्कर जोशी ९-१५, १५-११, १६-१४, सलील गाडगीळ वि. वि. आरिफ गिलानी १५-१२, १५-१० अजिंक्य धर्माधिकारी वि. वि. सागर वैरागडे १५-११, १५-११, शांतनू पाटील वि. वि. अनिरुद्ध गोखले १५-१२, १६-१४, हसप्रित सहानी वि. वि. निशांत अगरवाल १५-६, १५-६ आलोक देशपांडे वि. वि. राजू पिल्लई १५-९, १५-१३, अक्षय गद्रे वि. वि. गीतेश प्रसाद १५-३, १५-७.