पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने नॅक: बेंचमार्किंग फॉर क्वॉलिटी इम्प्रूमेंट इन हायर एज्युकेशन’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. जगन्नाथ पाटील नॅक ॲडव्हायझर बेंगलोर, डॉ.मनोहर चासकर अधिष्ठाता, सायन्स ॲड टेक्नोलॉजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मा.सौ.प्रमिला गायकवाड सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद व खजिनदार श्री. विजयसिंह जेधे यांचे हस्ते राजर्षी शाहू महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून झाले. या प्रसंगी डॉ.पाटील यांनी नॅक मुल्यांकन ही निरंतर प्रक्रिया असून शैक्षणिक उपक्रमात नॅक मुल्यांकनाला भविष्यात पर्याय नाही. प्रत्येक महाविद्यालयाला व शिक्षकांना या प्रक्रियेस सामोरे जायचे आहे. त्यामुळे भीती न बाळगता त्या प्रक्रियेत सहभागी व्हा . या प्रसंगी बेंचमार्किंग चे विविध प्रकार, स्टुडन्ट सॅटिस्फॅक्शन सर्वे, कागदपत्र पडताळणी (DVV),ॲल्युमि व इंडस्ट्री सहभाग, बेस्ट प्रॅक्टिसेस या विषयी मार्गदर्शन करताना जागातील शैक्षणिक संस्थांची उदाहरणे देऊन बेंचमार्किंग चे महत्व सांगितले. संस्थेच्या, समाजाच्या व देशाच्या शाश्वत विकासासाठी बेंचमार्क खूप महत्वाचे आहेत. या बेंचमार्कला मार्क्स आल्यामुळे महाविद्यालयांना आपण कुठे कमी पडतो या विषयी माहिती मिळते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या सात टक्के खर्च उच्च शिक्षणावर व्हावा. याच बरोबर नॅक मूल्यांकनासाठी येऊ घातलेल्या ‘परिसस्पर्श’ योजनेविषयी माहिती दिली. प्राध्यापकांनी गुणवत्तेसाठी काम करत रहावे शिक्षण संस्थेला चांगला दर्जा आपोआप मिळेल असे सांगून नॅकच्या प्रोसेस मध्ये सर्वांनी आपले राष्ट्रीय उत्तरदायित्व म्हणून काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. मनोहर चासकर यांनीं नॅक हि सर्वांची जबाबदारी असून टीचिंग लर्निंग प्रक्रियेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार सिस्टम तयार केली पाहिजे . या सिस्टीमचा विद्यार्थ्या बरोबर समाजाला देखील फायदा झाला पाहिजे असे आवाहन शिक्षण संस्थाना केले.