पुणे – काँग्रेस भवन शिवाजीनगर पुणे येथे पुणे जिल्ह्याचे आमदार संग्रामदादा थोपटे यांची धान्य तुला करण्यात आली. तसेच विश्वाचे शांततेचे प्रतिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची सोन्याची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मुकेश मधुकरराव धिवार यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष द. स. पोळेकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हे होते. तसेच सौ. राधिका मखामले , सौ. कल्पना उनावने , इंटकचे इंटकचे ॲड. फैयाज शेख, भोसले सर, अजय कांबळे, माजी नगरसेविका निता राजपूत, यासीन शेख, साबिस्तीन अडगळे, सुजीत म्हस्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते.