पुणे- पुण्यातील पीएमसी कॉलनी येथे सराईत गुन्हेगार अजय विटकर याच्यासह इतर साथीदारांनी संघटित टोळी तयार करून ‘आम्ही इथले भाई आहे’ असे मोठे मोठयाने बोलून वाईट शिवीगाळ करत पार्किंग केलेल्या 14 दुचाकी व चार चारचाकी वाहनांची तोडफोड करून नुकसान केले होते.अशा २८ जणांना पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का लावला आहे.या संदर्भात पोलिसांनी संगील्तले कि,’ अजय विटकर, रा. हारहरेश्वर सोसायटी जवळ ब्लॉकनं २३ वडारवाडी पुणे ( टोळी प्रमुख) त्याचे इतर ३०-३२ साथीदार यांनी संघटीत टोळी तयार करुन त्यांनी गैरकायदेची मंडळी जमवून आम्हीइथले भाई आहे असे मोठ मोठ्याने, वाईट वाईट शिवीगाळ करुन, पीएमसी कॉलनी मध्ये पार्किंग केलेल्यादुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड करुन यांनी त्यांचे हातातील लोखंडी हत्याराने, लाकडी दांडक्यांनीआजुबाजुस पार्क केलेल्या ०४ चारचाकी, १४ दुचाकी व ०१ तिन चाकी गाड्यांचे तोडफोड करुन नुकसान
केले तसेच आरोपीनी त्याचे हातातील लोखंडी धारदार हत्याराने फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देशानेडोक्यात वार करुन गंभिर जखमी केले.त्याबाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर २७३ / २०२३ भादवि कलम.३०७,१२०(ब)४२७,३२३,
५०४,५०६(२),१४३,१४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४ (२५), फौजदारी सुधारणा कायदा २०१३ चे कलम ७,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२,३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या गुन्हयाच्या तपास दरम्यान यातील निषन्न आरोपी नामे १) रूपेश उत्तम विटकर, वय – २२वर्षे, धंदा- काही नाही, रा.स.नं.३३७/९५४, विटकर बंगला, पांडवनगर, पुणे २) ईस्माईल इब्राहिम शेख, वय – १९वर्षे, रा.१००१ जुनी वडारवाडी, कुसाळकर बिल्डींग जवळ, पांडवनगर, पुणे. ३) गणेश हरीचंद्र धोत्रे,वय-१९वर्ष,रा-राजु मित्रमंडळा जवळ, ८८३, वडारवाडी पुणे ४) साहिल गणेश विटकर, वय – २० वर्ष, रा-ब्लॉक नं.४५,मारुती मंदिराजवळ, वडारवाडी पुणे. ५) लवकुश रामाअधीन चौव्हाण, वय – २२ वर्ष,रा-रुम नं. ३०७, एस आरेकॉलनी,पांडवनगर पोलीस चौकी जवळ, पुणे. ६) विजय ऊर्फ चपात्या हनुमंता विटकर, वय – २१ वर्ष, रा-डॉ. होमीभाभा हॉस्पीटल मागे, वडारवाडी पुणे. ७) चेतन ऊर्फ आण्णा राजु पवार, वय – २२ वर्ष, रा-८८३ मारुतीमंदिराजवळ वडारवाडी पुणे. ८) अनिल ऊर्फ काळया हनुमंत डोंगरे, वय – २१ वर्ष, रा – लालचाळ गोखलेनगर
पुणे. ९) विजय चंद्रकांत विटकर, वय १९ वर्षे, रा. हारहरेश्वर सोसायटी जवळ ब्लॉकनं २३ वडारवाडी पुणे.१०) धनराज ऊर्फ चिम्या काळुराम धोत्रे, वय – २३ वर्ष, रा-मारुती मंदिरामागे, ब्लॉकनं. ४३, वडारवाडी पुणे सर्व( टोळी सदस्य ) यांना अटक करण्यात आली असुन इतर २०-२२ आरोपींचा शोध सुरु आहे.आरोपी अजय विटकर (टोळी प्रमुख ) याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखालीप्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेऊन स्वताची संघटीत टोळीकरुन गुन्हे केलेले असून त्यांनी अवैध मार्गान अर्थिक फायदा मिळवण्याच्या उददेशाने जिवे ठार मारण्याचा
प्रयत्न करणे,गंभीर दुखापत करणे,, जबरी चोरी करणे, नागरीकांच्या मालमत्तेच तोडफोड करुन नुकसानकरणे,सर्वसामान्य नागरीकांच्या मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, बेकादेशीर जमाव जमविणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वांरवारकेले आहेत यातील आरोपी यांनी संघटीत पणे दहशतीच्या मार्गाने स्वताच्या अर्थिक फायदया करीतासदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम१९९९चे कलम ३(१)(ii), ३ (२) ३ (४) अर्तभाव करणेकामी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक
बालाजी पांढरे यांनी पोलिस उपायुक्त परिमंडळ ०४ पुणे शशीकांत बोराटे यांचे मार्फतीने अपर
पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे रंजनकुमार शर्मा यांना सादर केलेला होता.
सदर प्रकरणाची छाननी करुन वरील आरोपी यांना चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.न.२७३ / २०२३ भादवि कलम ३०७, १२० (ब) ४२७,३२३,५०४,५०६(२), १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४ (२५),फौजदारी सुधारणा कायदा २०१३ चे कलम ७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, ३७ (१) सह १३५प्रमाणे दाखल गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१)(ii),३(२)३(४) अर्तभाव करण्याची अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे रंजनकुमार शर्मा यांनी
मान्यता दिली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग पुणे शहर श्रीमती
आरती बनसोडे ह्या करीत आहेत.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर, रितेशकुमार, सह पोलीसआयुक्त संदिप कर्णीक अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा,पोलीस उप-आयुक्त परी ४ पुणे शहर श्री शशीकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती आरती बनसोडे यांचे मार्गदशनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजीपांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण, निगराणी पथकाचे सहा पोलिस निरीक्षक रत्नदीप
गायकवाड, पोलीस उप निरीक्षक, निलेशकुमार महाडीक, पोलीस उप निरीक्षक, रुपेश चाळके, अमंलदार
अमित गद्रे, सुहास पवार, मारुती केंद्रे यांनी केली आहे.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावरबारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे
सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भरदेण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही २३ वी कारवाई आहे.