पुणे : सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आणि पीडीएमबीएच्या सहकार्याने योनेक्स-सनराईझ एसबीए कप कॉर्पोरेट बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ ते ७ मे दरम्यान होणार आहे. स्पर्धा शिवाजीनगर येथील पीडीएमबीए मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे, अशी माहिती सुधांशू मेडसीकर यांनी दिली.बायजूज, होस्टरोयल, मॅच पॉइंट, द रस्टल नेस्ट, ऑल थिंग्ज फिजिओ हे स्पर्धेचे प्रायोजक आहेत. स्पर्धा पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी, ३० वर्षांवरील पुरुष एकेरी आणि दुहेरी, ४० वर्षांवरील पुरुष एकेरी व दुहेरी आणि ५० वर्षांवरील पुरुष एकेरी व दुहेरी या गटात होणार आहे. कॉर्पोरेटसाठी आयोजित या स्पर्धेत प्रथमच रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.
यातील विजेत्यांना ट्राॅफी आणि रोख पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्षे आहे. यात केवळ पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होता येणार आहे. आतापर्यंत २०० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १ मे असल्याचे मेडसीकर यांनी सांगितले.