पुणे : महाराष्ट्र शासनाने नगर विकास मंत्रालयामार्फत खडकी कॅन्टॉमेंटला जाहीर केलेला निधी लवकरात लवकर सुपूर्द करावा अशी मागणी शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी ही मागणी केली.
महाराष्ट्र शासनाने नगर विकास मंत्रालयामार्फत राज्यातील ७ कॅन्टॉमेंट बोर्डांना विकास कामांसाठी ५ कोटी चा विकास निधी मंजूर केला आहे. यामध्ये खडकी, पुणे, देहू रोड, अहमदनगर, औरंगाबाद, देवळाली(नाशिक), कामठी (नागपूर) या कॅन्टॉमेंटचा समावेश आहे. या बाबत खडकी कॅन्टॉमेंट बोर्डाने प्रस्ताव सदर केला असून तो प्रशासकीय छाननी नंतर मा. मुख्यमंत्री महोद्यांच्या स्वाक्षरीसाठी प्रलंबित आहे. स्वाक्षरी झाल्यास निधी कॅन्टामेंट बोर्डांना उपलब्ध होऊ शकणार असून तो लवकरात लवकर व्हावा अशी मागणी सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.