पुणे- महानगरपालिकेने शहराच्या एकूण बजेट च्या ५% रक्कम अपंगांसाठी खर्च करण्याचे बंधन असून ते होताना दिसत नाही,त्यासाठी व नौकरी मधे ४% दिव्यांगांना संधी मिळावी यासाठी आगामी काळात आपल्याला संघर्ष करावा लागेल.असे वक्तव्य येथे क्रिएटिव्ह फौंडेशन आणि एनॅब्लर चॅरिटेबल ट्रस्ट ह्या संस्थांनी दिव्यांगां साठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आ. चंद्रकांत दादा पाटील यांनी येथे केले आहे. समाजात सातत्याने सेवाकार्य करत राहायचे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण असून त्या संस्कारांमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला असे ते येथे म्हणाले
यावेळी क्रिएटिव्ह चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,एनॅब्लर चॅरिटेबल ट्रस्टचे अमोल शिनगारे,नेचरवॉक चे अनुज खरे,नगरसेवक दीपक पोटे,नगरसेवक जयंत भावे,नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे,कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,शहर चिटणीस प्रशांत हरसुले,महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे,कोथरूड मंडल सरचिटणीस गिरीश भेलके व अनुराधा एडके,उपाध्यक्ष राज तांबोळी,प्रभाग १३ चे अध्यक्ष राजेंद्र येडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ.पाटील म्हणाले या कार्यक्रमाचे मी जाहीर कौतुक करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे स्वप्न आहे की या देशात कोणीही मागून पोट भरु नये तर कष्ट करुन पोट भरावे,त्यासाठी त्यांनी आत्मनिर्भर भारत ची घोषणा केली आहे व तसे नियोजन केले आहे असे ही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले नरेंद्रभाई गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना मिळालेल्या सर्व भेटवस्तुंचा लिलाव आयोजित करायचे,अनेक धनिक व दानशूर व्यक्ती त्या वस्तू खरेदी करत असत व त्यातून उभ्या राहणाऱ्या निधीतून मोदीजी गरजूंना मदत करत असत,यातूनच त्यांनी स्त्रीयांसाठीची शाळा उभी केली व दिव्यांगांना स्वयं पूर्ण करण्यासाठीचे अनेक उपक्रम राबवले.अहमदाबाद येथील संस्कारधाम ही स्त्री शिक्षणासाठी उभारलेली संस्था सर्वांनीच अनुभवावी अशी असल्याचे ही ते म्हणाले.त्यालाच अनुसरून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा सप्ताहांतर्गत अनेक कार्यक्रमांचे नियोजन झाले
दिव्यांग व्यक्तीस सहानुभूतीची नव्हे तर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बळ देण्याची व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी कार्य करण्याची गरज असून क्रिएटिव्ह फौंडेशन त्यादृष्टीने काम करत आहे.येणाऱ्या काळात दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविले जातील असे क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.तसेच विविध उद्योगां मधे दिव्यांगां साठी ४% जागा राखीव असून त्या जागांवर दिव्यांगांनाच नौकरी मिळावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले.एनॅब्लर चॅरिटेबल ट्रस्ट ही दिव्यांगां साठी काम करणारी संस्था असून दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहे, पण कोरोनाच्या संकटकाळी दिव्यांगांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले असून आजच्या कार्यक्रमातून त्यांना दसरा दिवाळी साठी उपयुक्त शिधा देउन एक छोटीशी मदत करत आहोत असेही ते म्हणाले.यावेळी पुनीत जोशी यांच्या वतीने कर्वेनगर येथील जिम मधे उकडलेली अंडी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या दिव्यांग उल्हास जौंजाळ या बांधवास व्हील चेयर भेट देण्यात आली.तर क्रिएटिव्हच्या वतीने चहा विक्री करुन उदरनिर्वाह करु पाहणाऱ्या संतोष भालेराव या दिव्यांग मित्रास चहाचा मोठा थर्मास भेट देण्यात आला.हा धागा पकडून आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की महानगरपालिकेने शहराच्या एकूण बजेट च्या ५% रक्कम अपंगांसाठी खर्च करण्याचे बंधन असून ते होताना दिसत नाही,त्यासाठी व नौकरी मधे ४% दिव्यांगांना संधी मिळावी यासाठी आगामी काळात आपल्याला संघर्ष करावा लागेल.कारण तसे झाल्यास दिव्यांग बेरोजगार राहणार नाहीत व स्वावलंबी होतील.तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करताना चंद्रकांतदादांनी नरेंद्र भाई मोदी यांचे वक्तव्य सांगितले की राजकारण करत असताना किंवा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर मिळणाऱ्या निधीचा विनियोग हा समाजोपयोगी विकासासाठीच व्हावा तसेच तुम्ही जिथे कुठे आहात तिथे कोणी अडचणीत नाही ना हे बघावे असे ही ते म्हणाले.
मंजुश्री खर्डेकर यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी मी माझ्या पदाचा वापर करत असून राजकारणापेक्षा सामाजिक कार्यात जास्त समाधान मिळते व पदाचा वापर हा गरजूंसाठी करता येतो हे स्पष्ट करतानाच दिव्यांगां साठी सर्वतोपरी मदत करेन असेही त्या म्हणाल्या.
मंजुश्री खर्डेकर व अमोल शिनगारे यांनी प्रास्ताविक,संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन तर अनुज खरे यांनी आभार प्रदर्शन केले.