पुणे-पिसोळी उंड्री मुख्य रस्त्याचे काम रखडल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने धर्मावत पेट्रोल पंपासमोर ” रास्ता रोको आंदोलन ” करण्यात आले.
यावेळी जिल्याचे नेते/मा. जि.प.अध्यक्ष श्री.जालिंदर भाऊ कामठे, सरपंच मच्छिंद्र दगडे , उपसरपंच गणपत दगडे ,उद्योजक राजेंद्रशेठ भिंताडे ,वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, वाहतूक विभागाचे निंबाळकर साहेब, मा सरपंच स्नेहल दगडे ,मा सरपंच सुभाष टकले , मा सरपंच किरण येप्रे ,सोमनाथ दगडे , मा उपसरपंच दिपक धावडे, देविदास मासाळ ,मोरेश्वर धावडे युवा नेते आकाश टकले , लहू दगडे, विनायक धावडे व या आंदोलनात सर्व ग्रामस्थ व परिसरातील नागरिक सहभागी होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शेख साहेब यांना निवेदन देण्यात आले.पंधरा दिवसाच्या आतमध्ये काम चालू करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.