पुणे-मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ हे बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिनही आहे. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.या पत्रकार दिन सोहळ्यानिमित्त पुणे मीडिया वॉच व सिध्दार्थ वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारिता क्षेत्रांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते . हा कार्यक्रम सोमवार , ६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता पुणे कॅम्प भागातील नवा मोदीखानाजवळील आझम कॅम्पसमधील असेम्ब्ली हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे . यंदा सोहळ्याचे १५ वे वर्ष आहे . अशी माहिती पुणे मीडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर यांनी दिली .
यावेळी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ हे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे त्यानंतर जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे ” राजकारणाचा नवा पॅटर्न आणि पत्रकारिता ” या विषयावर व्याख्यान होणार आहे . त्यानंतर पत्रकारिता क्षेत्रांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . यामध्ये ग्रामीण भागातील फलटण येथील रमेश आढाव , महिला पत्रकार प्रयागा होगे , उपनगर वार्ताहर दिगंबर माने , नामदेव ढसाळ पत्रकारिता पुरस्कार हा कोरेगाव भीमा येथील रामदास लोखंडे , बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार पुरस्कार अलोक निरंतर , सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय भवानी पेठमधील काशेवाडी येथील धम्मपाल सेवा संघाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय , सिटीजन जर्नालिस्ट रामदास सूर्यवंशी , इलेक्ट्रॉनिक मीडिया पुणे दर्पण न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी विजय जगताप ,गुन्हे वार्तांकनासाठी देवेंद्र जैन , वृत्तपत्र छायाचित्रकार मंदार टण्णू , वृत्तपत्रविक्रेता , जीवनगौरव , युवा पत्रकार आदींना स्मृतीचिन्ह , शाल व पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .