पुणे-१ जानेवारी १८४८ रोजी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलीची शाळा बुधवार पेठमधील भिडे वाडा येथे सुरु केल्याबद्दल हा दिवस फुले दांपत्य सन्मान दिन असल्याने सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्यावतीने समता भूमी येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास माजी आमदार कमल ढोलेपाटील व सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा लडकत यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले
यावेळी नगरसेविका मनिषा लडकत , साधना लोखंडे , शशिकला ढोलेपाटील , मंगल लडकत , रंजना नाळे , नूतन शिवरकर , शालन भोजने व सपना माळी आदी उपस्थित होते .
१ जानेवारी १८४८ रोजी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलीची शाळा बुधवार पेठमधील भिडे वाडा येथे सुरु केल्याबद्दल हा दिवस फुले दांपत्य सन्मान दिन असल्याने युवा माळी संघाच्यावतीने समता भूमी येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास माजी आमदार कमल ढोलेपाटील व युवा माळी संघाच्या अध्यक्षा सुनीता भगत यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .
यावेळी मृणाल ढोलेपाटील , मंगेश ससाणे , अक्षय कोठावळे , स्नेहल बाळसराफ , वृषाली शिंदे , हनुमंत टिळेकर , अरुण कोद्रे , नलिनी माळी व अविंदा बोराटे आदी उपस्थित होते .