पुणे-दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात महाराष्ट्रातील पहिली दत्तगुरूंची पायी वारी पालखी सोहळा पुणे येथून श्री क्षेत्र गाणगापूरकडे प्रस्थान झाली . पालखीचे यंदाही पाचवे वर्ष होते . गुलटेकडीमधील डायस प्लॉट येथून त्रिमुखी दत्त चौक येथून सकाळी प्रस्थान झाली . या पालखीसोबत महिलावर्ग लहान मुले आणि दत्त भक्त सहभागी झाले होते . या पालखीचे आयोजन दत्तभक्त राहुल खुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले .